सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि मेलबर्न विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविड-19च्या पलिकडे मानसिक आरोग्य’ विषयावर उद्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 07 OCT 2020 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020

 

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्यावतीने ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न विद्यापीठाच्या सहकार्याने ‘कोविड-19नंतरह मानसिक आरोग्य’ या विषयावर उद्या (दि.8 ऑक्टोबर,2020)आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होत असलेल्या या  परिषदेचे उद्घाटन केद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ. थावरचंद गेहलोत आणि ऑस्ट्रेलिया- भारत संस्थेचे संचालक प्रा. क्रॅइग जेफरी संयुक्तपणे करणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे नवी दिल्लीमध्ये असलेले उच्चायुक्तही या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. 

कोविड-19 महामारीचा उद्रेक संपूर्ण जगभर झालेला आहे. या महामारीमुळे अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. अशा मानसिक समस्यांमुळे उद्भवणा-या परिस्थितीला कशा प्रकारे तोंड देता येईल तसेच मानसिक रूग्णांच्या पुनर्वसनासंबंधित विविध मुद्यांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया तज्ज्ञ आरोग्य कर्मचा-यांना ज्या ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे, त्याचे व्यवस्थापन कसे करता येईल, याचीही चर्चा करण्यात येणार आहे. बहुसांस्कृतिक मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्य चांगले राखणे, घरामध्ये राहून कार्यालयीन काम करणे, तसेच आत्महत्या आणि त्यासंबंधीच्या वृत्तांना भारतामध्ये प्रसार माध्यमांमधून दिली जाणारी प्रसिद्धी, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मानसिक आरोग्य आणि मानवाधिकार, दिव्यांगांच्या मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये लवचिकता निर्माण करण्यासाठी साधनांची निर्मिती करणे, अशा विविध विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात येणार आहे. 

नोव्हेंबर, 2019 मध्ये दिव्यांग सशक्तीकरण विभागाच्यावतीने ऑस्ट्रेलियाबरोबर एक सामंजस्य करार केला होता. यानुसार भारतातल्या दिव्यांगासाठी सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले होते. उद्या आयोजित करण्यात येणारी परिषद या सामंजस्य करारानुसार संयुक्त उपक्रम म्हणून आयोजित केली जात आहे. 

या परिषदेचे यू ट्यूब वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासाठी लिंक पुढील प्रमाणे आहे. https://youtu.be/GcNKczaqVsQ.

 

* * *

B.Gokhale/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1662355) Visitor Counter : 160