गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
कर्जाचे प्रस्ताव स्वीकारणे आणि त्यावर पुढील प्रक्रिया करणे यासाठी पीएमस्वनिधी आणि भारतीय स्टेट बँकेचे पोर्टल यांना जोडणारी एपीआय एकीकरण प्रक्रिया सुरु
पीएमस्वनिधी आणि भारतीय स्टेट बँकेचे ई-मुद्रा हे पोर्टल यांच्यात माहितीची देवाणघेवाण विनाव्यत्यय आणि सुलभतेने होण्यासाठी केले एकीकरण
पीएमस्वनिधी योजनेमध्ये आतापर्यंत 20लाख 50 हजाराहून जास्त रकमेसाठी कर्ज प्रस्ताव सादर आणि 7 लाख 85 हजार रुपयांच्या कर्जाला मंजुरी दिली
Posted On:
07 OCT 2020 12:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2020
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावर फिरून वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांसाठी सुरु केलेल्या पीएमस्वनिधी अर्थात “आत्म निर्भर निधी” या योजनेंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी पीएमस्वनिधी आणि भारतीय स्टेट बँकेचे पोर्टल यांना जोडणारी एपीआय एकीकरण प्रक्रिया सुरु केली. या एकीकरणामुळे पीएमस्वनिधी आणि भारतीय स्टेट बँकेचे पोर्टल यांच्यात माहितीची देवाणघेवाण विनाव्यत्यय आणि सुलभतेने होऊ शकेल. म्हणजेच पीएमस्वनिधी आणि स्टेट बँकेचे ई-मुद्रा हे पोर्टल यांच्यादरम्यान होणाऱ्या कर्ज मंजूर करणे आणि कर्जाचे प्रत्यक्ष वितरण होणे या प्रक्रिया सुरक्षित वातावरणात पूर्ण केल्या जातील. याचा फायदा पीएमस्वनिधी योजनेंतर्गत खेळत्या भांडवलासाठी कर्ज घेणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांना होईल. इतर बँकांशी पीएमस्वनिधी योजनेसाठी अशाच प्रकारचे एकीकरण करण्याचा विचार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय करत असून त्यासाठी आवश्यक सल्लागार बैठक लवकरच घेतली जाईल.
कोविड–19 महामारीमुळे लागलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत फिरत्या विक्रेत्यांना त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी खेळते भांडवल उपलब्ध व्हावे या उद्देशाने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 1 जून 2020 पासून पीएमस्वनिधी योजना सुरु केली आहे. शहरी भागातील तसेच शहरांच्या सभोवतीचा भाग तसेच ग्रामीण भागात 24 मार्च 2020 ला किंवा त्यापूर्वी रस्त्यांवर फिरून वस्तू विक्री करणाऱ्या 50 लाखांहून जास्त फिरत्या विक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
6 ऑक्टोबर 2020 पर्यंत 20 लाख 50 हजारांहून जास्त फिरत्या विक्रेत्यांनी पीएमस्वनिधी योजने अंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्ज सादर केले असून त्यातील 7 लाख 85 हजार प्रस्ताव मंजूर झाले आहेत आणि आतापर्यंत 2 लाख 40 हजार रुपयांहून जास्त किमतीच्या कर्जाचे वितरण झाले आहे.
* * *
U.Ujgare/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662258)
Visitor Counter : 211
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam