विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 निदानासाठी बहुपर्यायी किट्स तयार करण्याचे स्टार्ट अप कंपन्यांचे प्रयत्न प्रगतीपथावर, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या NSTEDB च्या ‘कवच’ CAWACH उपक्रमाचे सहाय्य

Posted On: 06 OCT 2020 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020

 

भारतात लवकरच कोविड-19 च्या जलद निदानासाठीची बहुपर्यायी किट उपलब्ध होण्याची शक्यता असून, काही स्टार्ट अप कंपन्या हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काम करत आहेत.

छोटे दवाखाने, विमानतळांसारखी प्रवेशद्वारे, किंवा छोट्या प्रयोगशाळांमध्येही करता येतील अशा जलद अँटीबॉडी चाचण्या आणि एक चाचणी कीट ज्यात संशयित कोविड रुग्णाची थेट अँटीजेन चाचणी केली जाऊ शकेलअसे तंत्रज्ञान विकसित करण्यावर काम सुरु आहे.

काही स्टार्ट अप कंपन्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आता कोविडच्या  चाचण्यांसाठी पुनर्वापर आणि विस्तार केला जात आहे कोविड आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठीचे केंद्र, कवच (CAWACH) चे ही यात सहकार्य मिळत आहे. राष्ट्रोय विज्ञान आणि तंत्रज्ञान उद्यमशीलता विकास मंडळ (NSTEDB) ने कवच, हा उपक्रम सुरु केला असून IIT मुंबईतील नवोन्मेश आणि उद्यमशीलता सोसायटी द्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

कोविड-19 वर तोडगा शोधणाऱ्या एकूण 51 कंपन्यांपैकी 10 कंपन्याना निदान चाचणी किट्स तयार करणे आणि त्यांचे वितरण यासाठी सहकार्य केले जात आहे. अनेक तंत्रज्ञान ICMR कडून मान्यता मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे, ही मान्यता मिळाल्यावरच ते लागू केले जाऊ शकेल.

ओमिक्स संशोधन आणि निदान प्रयोगशाळा लैम्प (LAMP), चाचणी विकसित करत आहे. या किटमध्ये रंगांच्या आधारावर, तयार होणाऱ्या अल्गोरिदम वरुन नमुना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचे लगेच निदान होऊ शकेल. अनेक ठिकाणी ही किट वापरता येईल.

एक ट्यूब असलेल्या किट्स बाहेर सामान्य तापमानात देखील वापरल्या जाऊ शकतील आणि त्यांची किंमतही अगदी कमी असेल.

पाथशोध हेल्थकेअर या प्रयोगशाळेत कोविडसाठीच्या रॅपिड अँटीबॉडी चाचण्या तयार करण्याचे काम सुरु आहे. इतर काही प्रयोगशाळांमध्ये चाचण्या कीट्स विकसित करण्याचे काम सुरु आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1662162) Visitor Counter : 202