रसायन आणि खते मंत्रालय
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी तंत्रज्ञान आणि कृषिविषयक संशोधन बाबत प्रसार तसेच प्रोत्साहनासाठी इफ्को आणि प्रसारभारती यांनी केल्या करारावर स्वाक्षऱ्या
Posted On:
06 OCT 2020 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020
भारतीय कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी तंत्रज्ञान आणि कृषिविषयक संशोधन यांचा प्रचार तसेच प्रसार करण्यासाठी जगातील सर्वात मोठा सहकारी खत उपक्रम इफ्को आणि प्रसारभारती यांच्यात सोमवारी करार झाला. नवी दिल्ली च्या पृथ्वी भवन इथे झालेल्या कार्यक्रमात यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
या करारानुसार, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध अभिनव तंत्रज्ञानाविषयीची माहिती डीडी किसान या वाहिनीवरील 30 मिनिटांच्या कार्यक्रमातून अत्यंत सोप्या भाषेत दिली जाईल.
शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांना शेतीतील नवनवे तंत्रज्ञान आणि त्यांचा प्रत्यक्ष उपयोग याविषयी माहिती विषद करणे आवश्यक आहे. हा नवा करार हे लक्ष्य साध्य करणार आहे. डीडी किसान या वाहिनीवरील प्रत्येकी 30 मिनिटांचा एक अशा एकूण या कार्यक्रमाच्या 25 भागांमधून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाईल.
देशातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी माहिती डीडी किसान या वाहिनीवरील कार्यक्रमाद्वारे प्रसारित होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, या नव्या उपक्रमामुळे 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य साध्य करायला देखील मदत होईल असे मत इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.यु.एस.अवस्थी यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रसार भारतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोप्या भाषेत नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर वेम्पती यांनी सांगितले. हे कार्यक्रम डिजिटल माध्यमातून देखील प्रसारित केले जातील जेणेकरून तरुण शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा घेता येईल असे ते म्हणाले.
आज झालेल्या करारामुळे, संशोधकांनी प्रयोगशाळेत केलेले संशोधन आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत केलेले प्रयोग यांच्या मिलापातून तरुण शेतकऱ्यांना भविष्यात शेती करताना मोठे प्रोत्साहन मिळेल असे दूरदर्शनचे महासंचालक मयंक अगरवाल यांनी सांगितले.
B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662147)
Visitor Counter : 207