आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल केले जारी
Posted On:
06 OCT 2020 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2020
केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 च्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेद आणि योगावर आधारित नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल आज आभासी पध्दतीने घेण्यात आलेल्या परिषदेत जारी केले आहे.
श्रीपाद येसो नाईक, आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), डॉ. राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीती आयोग आणि डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य (आरोग्य), नीती आयोग हे देखील आज आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या या परिषदेत यावेळी सामील झाले होते.
आयसीएमआरचे माजी महासंचालक डॉ. व्ही.एम. कटोच यांच्या अध्यक्षतेखाली, 'नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल: कोविड -19' मध्ये आयुर्वेद आणि योगा यांच्या समावेश यासंदर्भातील समितीने अहवाल तयार केला आणि स्वीकार्य प्रायोगिक आणि क्लिनिकल डेटावर आधारित शिफार सादर केल्या.
हे निष्कर्ष, औषधांचे संभाव्य फायदे आणि सुरक्षितता दर्शविणारे असून कोविड 19 वरील राष्ट्रीय कृती दल आणि संयुक्त देखरेख समूहासमोर सादर केले गेले आणि त्यानंतर नीती आयोगाच्या शिफारशींनुसार प्रोटोकॉलमध्ये विकसित केले गेले.
आयुष मंत्रालायमार्फत लोकांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासंदर्भातील मार्गदर्शन आतापर्यंत लोकप्रिय झाल्याबद्दल मंत्रालयाचे कौतुक करीत डॉ. हर्ष वर्धन यांनी नमूद केले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 महामारीच्या काळात योग्य व्यवस्थापनासाठी आयुष मंत्रालयासोबत सल्लामसलत करण्यावर भर दिला आहे.
प्रतिबंधात्मक आणि रोगप्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भातील हे प्रोटोकॉल केवळ कोविड व्यवस्थापनातच नाही तर आधुनिक काळात समस्यांचे निराकरण करण्यासाठी पारंपारिक ज्ञान सुसंगत बनवण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण पाऊल आहे". गुडुची, अश्वगंधा, आयुष-64 यासारख्या सहज उपलब्ध होणाऱ्या आयुर्वेदिक वनौषधींचा कोविडवरील उपचारांमध्ये समावेश केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतर आयुर्वेदाकडे फारसे लक्ष गेले नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्या महत्वावर भर दिला ” असे ते पुढे म्हणाले.
B.Gokhale/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1662036)
Visitor Counter : 235
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam