कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्ली येथे एकात्मिक आरोग्य सेवा आणि संवाद या विषयावरील जागतिक परिषदेला संबोधित केले
Posted On:
03 OCT 2020 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2020
विविध देशांतील तज्ज्ञांचा सहभाग असलेल्या एकात्मिक आरोग्यसेवा आणि संवाद या विषयावरील जागतिक परिषदेला संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, कोविडने वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष समाकलित आरोग्यसेवेकडे वळवले आहे आणि आता जगभरातील चिकित्सक आरोग्य व्यवस्थापनातील वेगवेगळ्या प्रवाहांमधील सर्वोत्कृष्ट समन्वयाचा विचार करीत आहेत.
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रोफेसर इलिसा इपेल, हार्वर्डचे डॉ पीटर वेन, लॅटीन अमेरिकेच्या डॉ सुसान बॉयर वू आणि हार्वर्डचे प्रोफेसर विक्रम पटेल यांनी वेबिनारला संबोधित केले.
डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले, कोविड संक्रमण काळात अनेक अॅलोपॅथी वैद्यकीय व्यावसायिक जे आतापर्यंत इतर औषधी यंत्रणेबद्दल साशंक होते त्यांनी आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या औषधांमध्ये रस दाखवला.वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता, साथीच्या रोगात सर्व प्रकारच्या वैद्यकीय अभ्यास शाखांनी एकत्र येऊन इष्टतम केंद्रीय बिंदू शोधावा, असे ते म्हणाले.
कोविड-पूर्व काळातही, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे की अ-सांसर्गिक रोगांवर उपचार करताना, उदाहरणार्थ मधुमेह-मेलिटस, मधुमेहावरील-इन्सुलिनचा डोस निसर्गोपचारात उपलब्ध योगासने आणि जीवनशैलीतील काही बदल करुन अनुरुप सरावासह कमी केला जाऊ शकतो.
तथापि, ते म्हणाले की, कोविड आव्हानाचा सामना करताना काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये साशंकता निश्चितच होती परंतु विविध उपचार पद्धतींचा अवलंब केल्याने विशेषतः आयुष औषधांचा वापरामुळे संक्रमणावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात सर्वानुमते ठराव आणला, परिणामी योग अक्षरशः जगातील प्रत्येक घरात पोहोचला. तसेच,पंतप्रधानांनीच देशी वैद्यकीय व्यवस्थापन पद्धतींचे महत्त्व लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाची स्वतंत्र स्थापना केली, असे डॉ जितेंद्र सिंग म्हणाले.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661452)
Visitor Counter : 159