संरक्षण मंत्रालय
एअर मार्शल विक्रम सिंह यांनी वायूदलाच्या पश्चिम कमांडच्या मुख्यालयाचे एसएएसओ, हेडक्वार्टर्स वेस्टर्न एअर कमांड म्हणून स्विकारला पदभार
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2020 10:09PM by PIB Mumbai
एअर मार्शल विक्रम सिंह यांनी वायूदलाच्या पश्चिम कमांडच्या मुख्यालयाचे सिनियर एअर स्टाफ ऑफिसर (एसएएसओ,हेडक्वार्टर्स वेस्टर्न एअर कमांड) म्हणून ,दिनांक 1 आँक्टोबर 2020 रोजी पदभार स्विकारला.
ते 21 डिसेंबर 1984 मधे वायुदलात वैमानिक झाले होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरीया येथील वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम (फ्लाईंग इंन्स्ट्रक्टर कोर्स),एक्सपरीमेंटल फ्लाईट टेस्ट कोर्स (प्रशिक्षण अभ्यासक्रम) आणि स्टाफ कोर्स(कर्मचारी अभ्यासक्रम) पूर्ण केला आहे . मिग -21आणि मिराज -2000 या विमानांचे ते वैमानिक होते. त्यांनी राष्ट्रीय हवाई चाचणी केंद्रात (नँशनल फ्लाईट टेस्ट सेंटर) हवाई चाचणी परीक्षक (फ्लाईट टेस्ट ड्यूटीज)म्हणून, तसेच हवाईदल स्थानकावर कर्तव्य बजावले आहे ,तसेच वायुदलाच्या मुख्यालयात विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांनी एकात्मिक संरक्षण सेवा मुख्यालयात(इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ हेडक्वार्टर्स) येथेही काम पाहिले असून ते यापूर्वी वायुदलाच्या मुख्यालयात वायुदलाच्या सेवा विभागाचे (योजना) असिस्टंट चीफ ऑफ द एअर स्टाफ म्हणून काम पहात होते.

****
M.Iyangar/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661172)
आगंतुक पटल : 150