कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
अन्नदात्याला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांमुळे महात्मा गांधींना सर्वाधिक आनंद झाला असता- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग
नव्या कायद्यामध्ये बापूंच्या ग्रामीण आणि कृषी केंद्रित दूरदृष्टीचे वास्तव दर्शन- डॉ जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
02 OCT 2020 9:00PM by PIB Mumbai
कृषी आणि ग्रामीण उन्नती हा गांधीजींसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणूनच, आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता, असं मत, केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. गांधी जयंती निमित्त दिल्लीतील ‘केंद्रीय भांडार आणि केंद्रीय धोरण तसेच नेतृत्व केंद्र’ यांनी आयोजित केलेल्या, ‘महात्मा गांधी यांचे स्वच्छताविषयक प्रयोग-समृद्धीसाठीची गुरुकिल्ली’ या विषयावरील कार्यक्रमात ते बोलत होते.

या नव्या कायद्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बापूंचे ग्रामीण उन्नती आणि कृषी-केन्द्रीत या दूरदृष्टीचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे.
गेल्या सहा वर्षात केंद्र सरकारने कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांची त्यांनी यावेळी माहिती दिली. या सर्व योजना म्हणजे कृषी क्षेत्राचे लोकशाहीकारण आहे, असे ते म्हणाले. या कायद्यांमुळे शेतकरयांना पहिल्यांदाच निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
या कायद्यांमुळे भारतीय कृषीक्षेत्र जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत उतरू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेले स्वच्छता अभियान लवकरच जनचळवळ बनले. एखाद्या नेत्याने सुरु केलेले अभियान जन चळवळ होण्याच्या हे जगातील एकमेव उदाहरण असावे.
स्वच्छतेनंतर गांधीजींच्या निरोगी भारताचे स्वप्नही मोदी सरकार पूर्ण करत आहे. मोदीजींच्या पुढाकाराने आज जागतिक योग दिनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो आहे.असंही ते म्हणाले.

महात्मा गांधी यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आज 70 वर्षानंतर मोदी सरकार काम करत आहे. आज जगावर कोरोनाचे संकट आले असतांना, गेल्या सहा वर्षात, देशभर चाललेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे आज आपल्याला स्वच्छतेच्या सवयी लागल्या असून, त्याचा लाभ होतो आहे.बापूंच्या स्वच्छतेच्या आग्रहाचे महत्व आज कोरोनामुळे सगळ्यांना समजले आहे.
आत्मनिर्भर भारत हे सरकारचे अभियानही महात्मा गांधी यांच्या ‘स्वराज्य’ या संकल्पनेचे विस्तृत रूप आहे, असे ते म्हणाले.
केंद्रीय भांडार ने सध्याच्या सरकारमध्ये नवी कार्यसंस्कृती आपलीशी केल्याबद्दल त्यांनी या संस्थेचे कौतुक केले. गेल्या तीन वर्षात या संस्थेने आपली उलाढाल दुपटीने वाढवली आहे. यावेळी केंद्रीय भांडारचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
<><><><><>
B.Gokhale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1661144)
आगंतुक पटल : 201