नौवहन मंत्रालय
मनसुख मांडवीय यांच्या हस्ते भारतीय नौवहन महामंडळाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यास प्रारंभ
कंपनीने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने गांधी जयंतीनिमित्त प्रेरणा घ्यावी- मांडवीय
Posted On:
02 OCT 2020 8:51PM by PIB Mumbai
केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज भारतीय नौवहन महामंडळाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
मांडवीय यांनी भारतीय नौवहन महामंडळाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण केले. नौवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे. याप्रसंगी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मंत्र्यांनी पुरस्कार प्रदान केले.
याप्रसंगी बोलताना मनसुख मांडवीय यांनी भारतीय नौवहन महामंडळाने 59 वैभवशाली वर्षे पूर्ण करुन 60 व्या वर्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले. मंत्र्यांनी कंपनीच्या आर्थिक कामगिरीचे कौतुक केले आणि म्हणाले, भारतीय नौवहन मंडळाचा विकास म्हणजे भारताचा विकास होय. मांडवीय म्हणाले, कंपनीचा स्थापना दिवस गांधी जयंतीच्या दिवशी आहे, ज्याप्रमाणे गांधीजींनी आत्मनिर्भरतेवर भर दिला त्याप्रमाणे कंपनीने आत्मानिर्भर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करावे. आगामी वर्षांत कंपनी आणि कर्मचार्यांनी उच्च उद्दिष्टे साध्य करावी अशी इच्छा मांडवीय यांनी व्यक्त केली.
नौवहन मंत्रालयाचे सचिव डॉ संजीव रंजन, भारतीय नौवहन मंडळाच्या सीमडी श्रीमती एच.के.जोशी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि एससीआय कर्मचारी आणि कुटुबीयांची याप्रसंगी उपस्थिती होती.
***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661142)
Visitor Counter : 157