जलशक्ती मंत्रालय

जलशक्ती मंत्रालयाकडून स्वच्छ भारत दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन, स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरण


पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत हागणदारीमुक्त भारताचे लक्ष्य जनचळवळीतून साध्य करत, वेळेपूर्वीच उद्दिष्टप्राप्तीतून ग्रामीण भारतात आमूलाग्र परिवर्तन: गजेंद्रसिंह शेखावत

Posted On: 02 OCT 2020 6:16PM by PIB Mumbai

 

आज गांधी जयंतीनिमित्त जलशक्ती मंत्रालयाने स्वच्छ भारत दिवस साजरा करत , स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरण केले. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या हस्ते यंदाच्या स्वच्छ भारत पुरस्कारांचे वितरण झाले. यात, विविध विभागात सर्वोत्कृष्ट ठरलेली राज्ये/केंद्रशासित प्रदेश, जिल्हे, तालुके, ग्रामपंचायत आणि इतर विविध श्रेणीतील तसेच सहा वर्षे राबवलेल्या अभियानाचे पुरस्कार देण्यात आले. पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्याक्रमात केंद्र, राज्ये आणि जिल्ह्यातील स्वच्छ भारत ग्रामीण अभियानाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला.

गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि पंजाब या राज्यांनी विविध पुरस्कार जिंकले. राज्य पातळीवरील पहिला पुरस्कार गुजरातला, जिल्हा पातळीचा पुरस्कार तामिळनाडूच्या तीरुनेलवेल्लीला, तालुका स्तरीय पुरस्कार मध्यप्रदेशातील उज्जैन जिल्ह्याच्या खाचरोड ला आणि सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा पुरस्कार, सालेमजवळच्या चिनौर ग्रामपंचायतीला मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी सुरु केलेल्या ‘गंदगी से मुक्त’ अभियानाच्या अंमलबजावणीत, तेलंगण राज्याला श्रमदान सहभाग क्षेत्रात पहिला पुरस्कार मिळाला. हरियाणाला हागणदारी मुक्त ग्रामीण क्षेत्रासाठीचा पुरस्कार मिळाला तर, पंजाबच्या मोगा, जिल्ह्याला भित्तीचित्रातून स्वच्छतेचा संदेश देण्यासाठीचा पुरस्कार मिळाला.

(पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा)

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत अभियान ग्रामीण एक जन चळवळ बनली असून अत्यंत कार्यक्षमतेने या अभियानाचे ‘हागणदारी मुक्त ग्रामीण भारत’उद्दिष्ट वेळेआधीच पूर्ण करण्यात आले. हे यश पुढे घेऊन जात, दुसऱ्या टप्प्यात, गावांना पूर्ण स्वच्छ करण्यासाठी हागणदारी मुक्त ग्रामीण भारत ही शाश्वत स्थिती कायम ठेवणे आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी यावेळी स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम करणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. स्वच्छ भारत अभियान ही जगातली सर्वात मोठी मानसिक परिवर्तनाची चळवळ आहे, असं सांगत, पुरस्कारप्राप्त सर्वांनी पुढेही आपापल्या भागात जनजागृती करत पूर्वीच्याच उत्साहाने हे अभियान पुढे चालवावे, असे कटारिया म्हणाले.

जलशक्ती विभागाचे सचिव यु पी सिंह यांनीही यावेळी महात्मा गांधी यांच्या स्वच्छता चळवळीचे स्मरण करत आपले विचार मांडले

यावेळी स्वच्छ भारत अभियानाविषयीचा एक लघुपट दाखवण्यात आला आणि एका ई पुस्तकाचेही स्मरण करण्यात आले. या अभियानाअंतर्गत,आजवर देशभरात 50,000 पेक्षा अधिक शौचालये बांधण्यात आली

स्वच्छ भारत दिवस 2020 ई-बुक बघण्यासाठी इथे क्लिक करा.

*****

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1661055) Visitor Counter : 200