पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 2 ऑक्टोबर रोजी ‘वैभव परिषदे’ चे उद्घाटन करणार

Posted On: 01 OCT 2020 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑक्‍टोबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबर रोजी, संध्याकाळी 6:30 वाजता वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.  

वैभव परिषद ही परदेशी आणि निवासी भारतीय संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांची आभासी परिषद असून 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2020 दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावरील विकासासाठी शैक्षणिक आणि संशोधन तसेच तंत्रज्ञान आधार मजबूत करण्यासाठी सहयोग यंत्रणेवर चर्चा करण्यासाठी जगभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन व विकास संस्थांमध्ये (R&D) भारतीय वंशाच्या दिग्गजांना एकाच व्यासपीठावर आणणे हे या परिषदेचे उद्दीष्ट आहे.

उद्घाटनानंतर ऑनलाईन चर्चासत्रे होणार आहेत. महिनाभर चालणाऱ्या परिषदेत 55 देशांतील 3000 भारतीय वंशाचे शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ, 10,000 निवासी शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ परिषदेत वेबिनार, व्हिडीओ कॉन्फरन्स या माध्यमांतून विविध पातळ्यांवर होणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत. भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 200 शैक्षणिक संस्था आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग पूर्ण ऑक्टोबर महिना चालणाऱ्या परिषदेचे आयोजन करत आहे. 

40 पेक्षा अधिक देशांचे 1500 पॅनेलिस्ट, 200 आघाडीच्या भारतीय संशोधन आणि विकास आणि शैक्षणिक संस्था 18 विविध क्षेत्रांवर आधारीत 80 विषयांवरील 200 चर्चासत्रांमध्ये आभासी पद्धतीने सहभागी होणार आहेत. समारोपाचे सत्र सरदार पटेल जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे.

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1660840) Visitor Counter : 157