रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेची सप्टेंबर 2020 मध्ये, मालवाहतुकीच्या माध्यमातून 9896.86 कोटी रुपयांची कमाई, गेल्यावर्षीच्या तुलनेत 1180.57 कोटी रुपयांनी अधिक कमाई. मालवाहतूक महसुलात 13.54% नी वाढ

सप्टेंबरमधील मालवाहतूक गेल्यावर्षीच्या तुलनेत 15.3 % ने अधिक

Posted On: 01 OCT 2020 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 ऑक्‍टोबर 2020

 

उल्लेखनीय घटनेत, भारतीय रेल्वेने कोविड परिस्थितीतही गेल्यावर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत अधिक महसूल कमावला आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये, भारतीय रेल्वेने 9896.86 कोटी रुपयांचा महसूल मालवाहतुकीच्या माध्यमातून कमावला आहे, ही कमाई गेल्यावर्षीच्या याच कालावधीतील कमाईपेक्षा 1180.57 (8716.29 कोटी रुपये) कोटी रुपयांनी अधिक आहे. मालवाहतूक महसूलात 13.54% ची वाढ झाली आहे.

इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, मालवाहतुकीतील ट्रेंड आर्थिक क्रियाकलापांचे विस्तृत रुप प्रतिबिंबित करतात.

भारतीय रेल्वेने मालवाहतुकीत वृद्धी घडवून आणण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सप्टेंबर 2020 महिन्यातील रेल्वे मालवाहतुकीचा भार आणि मालवाहतूक महसूल गेल्यावर्षीच्या लोडिंग आणि उत्पन्नापेक्षा अधिक आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये रेल्वेच्या मालाची लोडींग 102.12 दशलक्ष टन होती, जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 13.59 दशलक्ष टनांनी अधिक आहे. मालवाहतुकीत 15.35% ची वाढ झाली आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये रेल्वेने मालवाहतुकीच्या माध्यमातून 9896.86 कोटी रुपयांची कमाई केली आहे, जी गेल्यावर्षीच्या तुलनेत 1180.57 कोटी रुपयांनी अधिक आहे. मालवाहतूक महसूलात 13.54% वाढ झाली आहे.

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मालवाहतुकीतील सुधारणा शून्य आधारीत वेळापत्रकात समाविष्ट केल्या जाणार आहेत.

रेल्वेने मालवाहतुकीकडे लक्ष वळवण्यासाठी अनेक सवलती/सुट दिल्या आहेत. कोविड-19 परिस्थितीचा उपयोग रेल्वेने सर्वांगीण कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी केला आहे

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1660774) Visitor Counter : 6