आयुष मंत्रालय
कोविड - 19 संकटाने आयुष विषयातील 'संशोधन संस्कृतीला' दिले प्रोत्साहन
Posted On:
30 SEP 2020 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
कोविड - 19 महामारीने आयुष शास्त्राच्या, आरोग्यास प्रोत्साहन देणाऱ्या आणि रोग-प्रतिबंधक उपायांवर प्रकाशझोत टाकला आहे. मात्र आयुष विषयांमधील पुरावा-आधारित अभ्यास करण्यासाठी उदयोन्मुख राष्ट्रव्यापी कल चर्चेत आला नाही.
कोविड -19 च्या नोंदणीकृत चाचण्यांसाठी भारताच्या क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री (सीटीआरआय) चा सखोल शोध घेण्यात आला. त्यात 1 मार्च 2020 ते 25 जून 2020 या कालावधीत आयुर्वेद उपायांचा समावेश होता. या काळात आयुर्वेदात 58 नवीन चाचण्यांची नोंद झाली.
2020 च्या ऑगस्टच्या बातमीनुसार सीटीआरआयमध्ये नोंदविण्यात आलेल्या 203 चाचणीपैकी 61.5 टक्के आयुष विषयातील होते. जर्नल ऑफ रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स मध्ये 'सीटीआरआयमध्ये नोंदणीकृत कोविड19' यावर आयुर्वेद संशोधन अभ्यास; एक महत्त्वपूर्ण मूल्यांकन' या शीर्षकाखाली आयुष विषयातील वाढत्या संशोधन संस्कृतीवर प्रकाश टाकणारा एक नवीन अभ्यास प्रकाशित झाला आहे.
आयुर्वेद आणि कोविड - 19 संदर्भात या सीटीआरआय नोंदणीकृत चाचण्यांमध्ये काही अतिरिक्त माहिती दिली आहे. नोंदवलेल्या एकूण चाचणीपैकी अंदाजे 70% चाचण्या सरकार व आयुष्य मंत्रालयाशी संबंधित आयुर्वेदातील विविध भागधारकांनी प्रायोजित केल्या आहेत. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स संस्थेच्या संशोधकांनी लिहिलेले इन्स्टंट पेपर आयुर्वेद आधारित कोविड - 19 वैद्यकीय चाचण्यांविषयी सविस्तर माहिती प्रदान करतात.
आयुष क्षेत्रातील पुरावा आधारित अभ्यासाचा हा कल देशातील सार्वजनिक आरोग्य उपक्रमांसाठी महत्त्वपूर्ण आहे. या अभ्यासाच्या परिणामांमुळे देशभर प्रभावी उपाय मिळू शकतात.
B.Gokhale/S.Tupe/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660305)
Visitor Counter : 229