आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयसीएमआरच्या हिस्ट्री टाईमलाईनचे डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते अनावरण


लस वेब पोर्टल, कोविड-19 राष्ट्रीय क्लिनिकल रजिस्ट्री आणि मोबाईल स्ट्रोक युनिटचेही केले उद्‌घाटन

Posted On: 28 SEP 2020 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या मुख्यालयाला भेट दिली. आयसीएमआरची ऐतिहासिक कामगिरी दर्शवणाऱ्या टाईमलाईनचे त्यांनी अनावरण केले तसेच आयसीएमआरच्या मोबाईल स्ट्रोक युनिट आणि कोविड लस आणि क्लिनिकल रजिस्ट्री पोर्टलचेही त्यांनी उद्‌घाटन केले. आयसीएमआरचे महासंचालक डॉ बलराम भार्गव, आयसीएमआर-एनआयएन संचालक डॉ आर हेमलता आणि इतर वरिष्ठ अधिकारी आणि संशोधक यावेळी उपस्थित होते.

आयसीएमआरची 108 वर्षांची वाटचाल   दर्शवणाऱ्या  हिस्ट्री टाइम लाईनचे त्यांनी अनावरण केले, 1911 मध्ये इंडियन रिसर्च फंड असोसिएशन या नावाने ही परिषद ओळखली जात होती तेव्हापासूनची  कामगिरी यात मांडण्यात आली आहे. रोग नियंत्रणासाठी आयसीएमआर आणि संस्थांचे कार्यक्रम आणि धोरण,प्रसूती आणि बाल आरोग्य, एच आय व्ही, कर्करोग, पोषण यासह इतर क्षेत्रातले आयसीएमआरचे  अग्रगण्य कार्य यात आहे.

मोबाईल स्ट्रोक युनिटचेही त्यांनी उद्‌घाटन केले.  हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाने लोक ग्रस्त होत असल्याचे पाहणे क्लेशदायी आहे. वेळेवर उपचार केल्याने मृत्यूचे प्रमाण कमी राखता येऊ शकते. आसाममध्ये पक्षाघाताचे मोठे प्रमाण आणि त्यासाठीच्या  सुविधांचा अभाव अशा परिस्थितीत हा उपक्रम या प्रदेशातल्या जनतेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लस पोर्टल आणि कोविड क्लिनिकल रजिस्ट्रीचेही त्यांनी उद्‌घाटन केले. लस विकसित करण्या संदर्भातल्या स्थितीच्या  पारदर्शी माहितीच्या महत्वावर भर देताना, हे पोर्टल लस विकसित करण्यासंदर्भात, सध्या सुरु असलेल्या वैद्यकीय चाचण्या आणि देशात तसेच जागतिक स्तरावर यासंदर्भातली प्रगती याबाबत   उपयुक्त आणि महत्वाची माहिती पुरवेल असे त्यांनी सांगितले.

कोविड काळात लस विकसित होण्यासंदर्भातल्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत  देशातल्या लस विकसित करण्याबाबतच्या स्थितीची माहिती दर्शवणे महत्वाचे ठरले आहे.

कोविडची संसर्ग साखळी रोखण्यासाठी जनतेने यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

M.Chopade/N.Chitale/ P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659869) Visitor Counter : 154