पर्यटन मंत्रालय

'ग्रामीण पर्यटन- पूर्वीच्या छोट्या व्यवसायापासून नव्या निकषांकडे' या विषयावर आधारित 'देखो अपना देश' या वेबिनार मालिकेचे पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजन

प्रविष्टि तिथि: 28 SEP 2020 7:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर  2020

पर्यटन मंत्रालयातर्फे 26 सप्टेंबर 2020 रोजी 'देखो अपना देश' वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'ग्रामीण पर्यटन- पूर्वीच्या छोट्या व्यवसायापासून नव्या निकषांकडे' अशा नावाचा भाग दाखविण्यात आला. यामध्ये गावे, ग्रामस्थ, शेती, संस्कृती आणि शाश्वतता, उत्तरदायित्व आणि सामुदायिक जीवनाची संकल्पना, यावर भर देण्यात आला. शहरी उद्योग जवळपास ढासळून गेल्यामुळे लाखो पांढरपेशा कर्मचाऱ्यांनी आपला रोजगार गमावला किंवा त्यात मोठी कपात सहन केली आहे. अशावेळी, आपली शहरे व उद्योग उभारणारे अन्य लाखो कामगार लोक मोठा प्रवास करून त्यांच्या मूळगावी परतले असून ते आता तेथे ग्रामीण भागात पर्यायी व्यवस्था उभारण्याची मोठी शक्यता आहे. उपभोगवादाला कंटाळलेला शहरवासी आता निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी आणि भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी पिढ्यांपिढ्यांच्या परंपरेने आलेल्या खेड्यांकडे बघत आहे, तर काहींना जागतिक क्षितिजाकडे बघणाऱ्या गावाची आस आहे. हा नवा आणि उगवता पर्यटनप्रकार वयस्क व्यक्तींना भूतकाळात घेऊन जातो म्हणून, तर श्रीमंतांना वेगळ्या व सौन्दर्यपूर्ण जगात घेऊन जातो म्हणून- लोकप्रिय होत चालला आहे.

पुराच्या संकटामुळे उत्तराखंड राज्याचा मोठा भाग पाण्यात बुडाला असून, राज्याचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे. सादरीकरण करणाऱ्या व्यक्तीने पहिल्या प्रकल्पाबद्दल सांगताना, 1800 गावे रिकामी करण्यात आली असून त्यातील काहींची वाटचाल नवीन संधींच्या दिशेने सुरु असल्याची माहिती दिली. ग्रामीण पर्यटनामुळे पृथ्वीचा- म्हणजे पर्यावरणाचा आणि लोकांचाही फायदा होऊ शकतो. समुदाय पर्यटनाचेच ते एक प्रतिबिंब म्हटले पाहिजे. स्थूलमानाने बघता, भारतात जवळपास 6,47,000 खेडी आहेत. संस्कृती, शेती, कला, निसर्ग, खाद्यउद्योग- अशा अनेक उद्योगांना पर्यटनामुळे चालना मिळते.

'बकरी स्वयंवर' हा एक वैशिष्ट्यपूर्ण समारंभ असून, यातून पर्यावरणाची हानी करणारा कोणताही कचरा तयार होत नाही. उत्तराखंडमध्ये अनेक खेडी नापीक आणि असिंचित क्षेत्रात असल्याने, ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पशुपालनाचा पर्याय महत्त्वाचा ठरतो. तेथे बोकडांची संख्या शेळ्यांपेक्षा खूप जास्त असते आणि बहुतांश बकरीपालक हे लहान शेतकरी असल्याने ते बकऱ्यांना चराईसाठी मोकाट सोडून देतात. तेथे जनुकांच्या वैविध्याच्या दृष्टीने पद्धतशीर काम केले जात नाही वा त्याबद्दल पुरेशी जागरूकताही नाही. या पार्शवभूमीवर, 'ग्रीन पीपल' तर्फे 'बकरी स्वयंवर' हा खास कार्यक्रम घेतला जातो. यामुळे शेळ्या-बकऱ्याचे जनुकीय वैविध्य वृद्धिंगत होण्यास मदत होते. तसेच पशुपालनाच्या अधिक उच्च पातळीसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जाते.

'बकरी स्वयंवर' ही साधी आणि वैज्ञानिक संकल्पना असून स्थानिक उत्पादन पद्धतीला ती अनुकूल आहे. यासाठी ग्रीन पीपल संस्थेने घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांना 2019 मध्ये IRTA म्हणजे भारतीय जबाबदार पर्यटन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

'देखो अपना देश' हे वेबिनार मालिका, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय इ-प्रशासन विभागाच्या तांत्रिक सहकार्याने सादर केली जाते. या वेबिनारची सत्रे आता पुढील लिंक वर पाहता येणार आहेत-

https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured

तसेच, पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाजमाध्यम खात्यांवरही पाहता येणार आहेत.

पुढील वेबिनार, 'गांधीजी- द बॉम्बे इयर्स (बॉम्बे मधील वर्षे)' अशा नावाचा असून, तो 1 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता सादर होणार आहे.

 

M.Iyengar/N.Chitale/ P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1659840) आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil