आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड–19ची अद्ययावत स्थिती


नवीन दाखल रुग्णांमध्ये 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 75 %

चाचण्यांची एकूण संख्या 7 कोटींपेक्षा अधिक

Posted On: 26 SEP 2020 5:22PM by PIB Mumbai

 

देशात गेल्या 24 तासात 85,362 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. नव्याने नोंद झालेल्यांपैकी 75 % रुग्ण हे 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रित आहेत.

महाराष्ट्र सातत्याने अव्वल क्रमांकावर आहे. त्या एकाच राज्यात 17,000 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अनुक्रमे 8,000 पेक्षा अधिक आणि 7,000 रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत 1,089 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोविड – 19 मुळे गेल्या 24 तासात 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये 83 टक्के रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात 416 रुग्णांचे मृत्यू तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे अनुक्रमे 86 आणि 84 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सरासरी (4,278) पेक्षा 17 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष लोकांची संख्या कमी आहे.

23 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय सरासरीच्या (68) तुलनेत  प्रति लाख लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे.

भारताने आपल्या देशातील चाचणी पायाभूत सुविधांसाठी जोरदार प्रयत्न केला आहे. आजमितीला, देशभरात 1823 वैद्यकीय प्रयोगशाळा आहेत, ज्यामध्ये 1086 शासकीय आणि 737 खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांचा समावेश आहे.

भारतातील चाचणी क्षमता दिवसाला 14 लाख पर्यंत ओलांडली आहे.

गेल्या 24 तासात 13,41,535 चाचण्या करण्यात आल्या. एकूण चाचण्यांच्या संख्येने आता 7 कोटींचा (7,02,69,975) टप्पा ओलांडला आहे.

मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमुळेच बाधित रुग्ण सापडणे शक्य झाले आहे. संकेतांमधून असे लक्षात आले आहे की, उच्च चाचणी दरामुळे एकत्रितपणे अखेरिस बाधितांचा दर कमी होईल.

या वेळी राष्ट्रीय बाधित रुग्ण दर 8.40 टक्के आहे आणि प्रति दशलक्ष लोकांमध्ये 50,920 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

  

.........

R.Tidke/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1659329) Visitor Counter : 188