संरक्षण मंत्रालय

इस्रायलसोबत संरक्षण उद्योगासंबंधी सहयोगी भागीदारीसंदर्भात वेबिनार आणि एक्सपोचे आयोजन

Posted On: 25 SEP 2020 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


भारत आणि इस्रायलदरम्यान वेबिनारचे 24 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. “सहयोगी भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाचे ग्लोबल आउटरीच: वेबिनार आणि एक्स्पो” ही या वेबिनारची संकल्पना होती. संरक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या संरक्षण उत्पादन विभागाने सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्या (एसआयडीम) माध्यमातून याचे आयोजन केले होते.  

पुढील पाच वर्षांत संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी आणि 5 अब्ज डॉलर्सचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या वेबिनार मालिकेतील हा पहिला वेबिनार आहे.

दोन्ही देशांचे संरक्षण सचिव आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती. दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासंबंधी चर्चा झाली.

भारत आणि इस्रायलदरम्यान संरक्षण औद्योगिक सहकार्यावरील उप गट (एसडब्ल्यूजी) तयार करण्याचे वेबिनारमध्ये जाहीर करण्यात आले. या उप गटाचे उद्दिष्ट म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरण, सह-विकास आणि सह-उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवकल्पना आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशांना संयुक्त निर्यात करणे हे आहेत.

वेबिनारमध्ये कल्याणी समूह आणि राफेल अॅडव्हान्सड डिफेन्स सिस्टीम्स यांच्यादरम्यान परस्पर सामंजस्य करार करण्यात आला.

संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी ‘एसआयडीएम-केपीएमजी’ या ज्ञानपत्राचे प्रकाशन केले.

वेबिनारला 300 पेक्षा अधिक प्रतिनिधींची उपस्थिती होती आणि एक्सपोसाठी 90 व्हर्च्युअल स्टॉल्स लावण्यात आले होते.


* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1659010) Visitor Counter : 237