पोलाद मंत्रालय

स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मंडळाची फेररचना करण्यास एसीसीची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 25 SEP 2020 1:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2020


केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने, सेल म्हणजेच स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या  मंडळाची फेररचना करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सेलच्या एकात्मिक स्टील प्लांटची चार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे उन्नत करुन संचालक दर्जाची   करण्यात आली आहेत. त्यातील तीन संचालक बोकारो,रुरकेला, भिलाई इथे प्रभारी संचालक म्हणून तर एक प्रभारी संचालक बुऱ्हानपूर आणि दुर्गापूर स्टील प्लान्ट यांचे  संयुक्त काम पाहिल.

मंडळाच्या फेर रचनेमुळे विकेंद्रीकरण होण्यासाठी मदत होणार असून, या प्रभारी संचालकांच्या नियुक्त्या थेट एसीसी कडून झाल्याने केंद्रीय कॉर्पोरेट प्रशासन रचनेत त्यांचे  मत मौल्यवान मानण्यात येणार असल्याने निर्णय वेगवान होतील. सेलच्या आधुनिकीकरण आणि विस्तार कार्यक्रमालाही या नियुक्त्यांमुळे वेग येईल.

सेलने ब्राऊन फिल्ड/ ग्रीनफिल्ड विस्तारा द्वारे 50 दश लक्ष टन क्षमतेचे उद्दिष्ट  ठेवले आहे. 2017 चे राष्ट्रीय स्टील धोरण आखतानाही हे विचारात घेण्यात आले असून  2030-31 पर्यंत ही क्षमता 300 दशलक्ष टन करण्याचे उद्दिष्ट आहे.

बदलत्या जागतिक वातावरणात तत्पर प्रतिसादासाठी  हे प्रभारी संचालक महत्वाचे ठरणार आहेत.

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1658957) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu