राष्ट्रपती कार्यालय

जम्मू आणि काश्मीरला पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन बनवण्यासाठी, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनवण्यासाठी, प्रयत्न करु : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Posted On: 20 SEP 2020 6:16PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जम्मू आणि काश्मीरमध्ये अंमलबजावणी या विषयावरील परिषदेला संबोधित करत होते. ते म्हणाले, जम्मू-काश्मीर हे ज्ञान, उपक्रम, नाविन्य आणि कौशल्य विकासाचे केंद्र म्हणून उदयास यावे हे त्यांचे स्वप्न आहे. मोहक काव्याचा आधार घेत राष्ट्रपती म्हणाले, या उपायांमुळे जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा पृथ्वीवरील नंदनवन, भारतमातेच्या मुकुटातील तेजस्वी रत्न बनेल.

राष्ट्रपतींनी व्हिडीओ संदेशाद्वारे परिषदेला संबोधित केले. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल, विद्यापीठांचे कुलगुरु आणि जम्मू आणि काश्मीरमधील महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतर भागधारकांची आज झालेल्या परिषदेला उपस्थिती होती.

एनईपीचे महत्त्व विशद करताना राष्ट्रपती म्हणाले, भारताकडे अभूतपूर्व लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आहे परंतु लोकसंख्येचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेले तरुण कुशल, व्यावसायिकदृष्ट्या सक्षम आणि सर्वार्थाने शिक्षित झाल्यासच त्याची सकारात्मक भावना लक्षात येऊ शकेल. जम्मू-काश्मीरमधील मुलांवर विश्वास दाखवत ते म्हणाले की जम्मू-काश्मीर हे अत्यंत हुशार, प्रतिभावान आणि नाविन्यपूर्ण मुलांचे भांडार आहे. ते पुढे म्हणाले की, शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांची प्रज्वलित मनेतयार होतील.

मूल्य-आधारित शिक्षणावर भर देताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, आपली परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा केवळ आपल्या मातृभाषेतून समजून घेणे आवश्यक आहे. मातृभाषेतूनच आपल्या देशातील सांस्कृतिक परंपरेचे पालन करत नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्रोत्साहन दिले जात आहे. ते पुढे म्हणाले की, या धोरणात ज्या त्रि- भाषेची कल्पना केली आहे त्यास फार महत्त्व आहे यामुळे बहुभाषिकता तसेच राष्ट्रीय ऐक्य वाढते, पण त्याच वेळी कोणत्याही राज्यात किंवा केंद्र शासित प्रदेशावर कोणतीही भाषा लादली जाणार नाही.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, या धोरणात शिक्षणातील सुलभता, समानता, सुलभता, उत्तरदायीत्व निश्चित करणे आणि कौशल्य विकास, अनुभवावर आधारित शिक्षण आणि तार्किक विचारांना प्रोत्साहित करणे यावर भर देण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारताचे तत्व सांगताना ते म्हणाले, हे ध्येय साध्य करण्यासाठी एनईपी 2020 मध्ये व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे.

राष्ट्रपतींनी या धोरणाची उद्दीष्टे आणि शांततामय व समृद्ध भविष्य साध्य करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांना शुभेच्छा दिल्या.

 

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657011) Visitor Counter : 191