संरक्षण मंत्रालय

भारतीय आणि अमेरिकन संरक्षण प्रतिनिधी मंडळाची संरक्षण सहकार्याबद्दल आभासी माध्यमातून चर्चा

Posted On: 16 SEP 2020 1:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 सप्‍टेंबर 2020

 

दहावी संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार समूह (DTTI) बैठक 15 सप्टेंबर 2020 रोजी आभासी माध्यमातून घेण्यात आली. या बैठकीच्या संयुक्त अध्यक्षपदी राज

कुमार, सचिव , संरक्षण उत्पादने, हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने तर अॅलन एम लॉर्ड, अंडर सेक्रेटरी ऑफ डिफेन्स फॉर  अॅक्वि़झिशन अॅन्ड सस्टेनमेंट,  अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या वतीने  सहभागी झाले होते ‌.  

DTTI समूह बैठकी या वर्षातून दोन वेळा एकदा भारत आणि एकदा अमेरिकेत अशा पद्धतीने आयोजित केल्या जातात. यावेळी मात्र कोविड महामारीमुळे ही बैठक आभासी पद्धतीने आयोजित केली गेली.
DTTI समूहाचे उद्दिष्ट म्हणजे द्विपक्षीय संरक्षण व्यापार संबंधात शाश्वत लक्ष्य निश्चित करणे तसेच सहकार्याने उत्पादनासाठी पुढाकार घेणे आणि सहकार्याने संरक्षण साधने  विकसित करणे.
दोन्ही देशांकडून परस्पर सहमतीने मंजूर झालेले प्रकल्प त्या त्या कार्यक्षेत्रात  प्रगतीपथावर रहावे यासाठी भूमी , सागरी,  हवाई आणि हवाई वाहतूक तंत्रज्ञान या क्षेत्रात पारंगत असलेले 4 संयुक्त कृती गट या DTTI अंतर्गत बनवले जातात. हे समूह प्रगतीपथावर असलेले कार्य आणि गरजेच्या कार्यकाळात प्राधान्यक्रमाने पूर्णत्वाला नेण्याची गरज असलेले प्रकल्प आणि संभाव्य संधी यांचा आढावा संयुक्त अध्यक्षांना सादर करतात. ‌DTTI यशस्वितेची हमी देण्यासाठी संयुक्त अध्यक्षांकडून धोरण उद्दिष्ट मसुद्यावर स्वाक्षऱ्या केल्या जातात. त्याद्वारे  विविध DTTI प्रकल्पांमध्ये संरक्षण तंत्रज्ञानातील सहकार्यासाठी एकमेकातील चर्चात्मक संबंध दॄढ करणे,    प्रगती योग्य मार्गावर नेणे  यासंबंधी साधारण मसुदा असतो.

ऑक्टोबर 2019 मध्ये  DTTI   समूहाची  याआधीची बैठक झालेली होती त्यामध्ये सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या DTTI  प्रकल्पांपैकी DTTI स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) हे पूर्ण झाल्याबद्दल  समाधान व्यक्त करण्यात आले. DTTI बैठकांसाठी धोरणाची रूपरेषा म्हणून  हा SOP वापरता येईल त्यामुळे दोन्ही बाजूंनी उद्दिष्टाप्रत पोहोचणारे मसुदे तसेच यशप्राप्तीचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी ते वापरता येईल.

 
* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1654943) Visitor Counter : 238