पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

पीएमयूवाय अंतर्गत पुनर्भरणा (रिफिल्स) मागणी

Posted On: 14 SEP 2020 5:18PM by PIB Mumbai

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत (पीएमयूवाय) 8  कोटी नवीन एलपीजी जोडण्या  देण्याचे उद्दिष्ट  निश्चित करण्यात आले होते आणि ते सप्टेंबर, 2019 मध्ये साध्य झाले होते. तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत पीएमयूवाय लाभार्थ्यांना ऑगस्ट 2020 पर्यंत 1306.87 लाख एलपीजी रिफिल्स  दिले आहेत.  पीएमजीकेपीअंतर्गत देण्यात आलेल्या एलपीजी रिफिलचा राज्य / केंद्रशासित प्रदेशनिहाय तपशील परिशिष्टात दिला आहे.

ओएमसींनी पीएमजीकेपी अंतर्गत  पीएमयूवाय लाभार्थ्यांना एलपीजी रिफिल्स खरेदीसाठी 9670.41 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत.

पीएमयूवाय लाभार्थींचा  2019-20 वर्षासाठी  सरासरी रीफिल वापर 14.2 किलोचे 3.01 सिलिंडर होता. पीएमयूवाय लाभार्थी कुटुंबातील लाभार्थींकडून एलपीजीचा अवलंब  आणि कायमस्वरूपी वापर  खाण्याच्या सवयी, घकुटुंबातील सदस्य संख्या , स्वयंपाकाच्या सवयी, एलपीजीची किंमत, विनामूल्य लाकूडफाटा आणि शेणाची सहज उपलब्धता इ.अनेक घटकांवर अवलंबून असतो.

ओएमसींनी नमूद केले आहे  की ओएमसीचे अधिकारी वितरकांना ग्राहकांच्या आवश्यकतेशिवाय किंवा त्यांच्याकडून कमी मागणी असूनदेखील रिफिल पुरवण्यास  भाग पाडत नाहीत.

केंद्रीय पेट्रोलियम आणि  नैसर्गिक वायू  मंत्री  धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

 

Annexure referred in part (a) of Unstarred Lok Sabha Parliament Question No. 89 to be answered on 14.09.2020 asked by Shri M.K. Raghavan regarding “Low Refill Demand under PMUY”.

State

Refill delivered against (April-August”20)

Chhattisgarh

31,71,197

Meghalaya

1,47,750

Assam

42,61,952

Tripura

3,79,414

Nagaland

75,654

Arunachal Pradesh

65,998

Madhya Pradesh

98,07,942

Lakshadweep

460

Jharkhand

47,15,844

Dadra and N. haveli, daman Diu

22,600

Ladakh

17,039

Gujarat

44,31,673

Manipur

2,51,990

Jammu and Kashmir

18,36,761

Rajasthan

1,01,62,602

Odisha

77,26,387

Andaman and Nicobar islands

20,769

Kerala

4,78,410

Mizoram

51,690

Bihar

1,44,39,342

Tamil Nadu

58,28,658

Telangana

17,65,085

Goa

2,024

Karnataka

54,48,255

Uttar Pradesh

2,58,12,057

Uttarakhand

7,29,948

West Bengal

1,65,21,610

Maharashtra

73,24,831

Andhra Pradesh

7,33,230

Himachal Pradesh

2,85,947

Puducherry

30,613

Haryana

14,90,015

Sikkim

21,055

Punjab

24,33,890

Delhi

1,94,869

Chandigarh

246

TOTAL

13,06,87,807

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654075) Visitor Counter : 183