वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

स्टार्टअप कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याबाबत राज्यांच्या क्रमवारीचे निकाल जाहीर

Posted On: 11 SEP 2020 8:36PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज, आभासी स्वरूपाच्या कार्यक्रमात स्टार्ट अप कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याच्या स्पर्धेतील राज्यांच्या क्रमवारीचा निकाल जाहीर करण्यात आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)तसेच गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीपसिंह पुरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश देखील यावेळी उपस्थित होते.

 

उद्योगांना आणि अंतर्गत व्यापाराला प्रोत्साहन विभागाने, राज्यांमधील स्टार्ट अप क्रमवारीचा उपक्रम राबवला. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पर्धात्मक वातावरण वाढवून त्यांना आपापल्या राज्यात स्टार्ट अप कार्यसंस्कृतीला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी उद्युक्त करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा एक क्षमता विकसित करणारा उपक्रम म्हणून राबवला गेला, ज्याद्वारे, सर्वच राज्यांना परस्परांच्या मदतीने कार्यपद्धतीत सुधारणा करता येईल आणि धोरण आखण्यात तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठी मदत करता येईल, अशी अपेक्षा आहे.

यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की स्टार्ट अप कंपन्या सरळधोपट मार्ग नव्हे तर अभिनव पद्धतीने विचार करतात आणि नवनव्या कल्पनांच्या आधारे प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. असे स्वयंउद्योजक, जे रोजगार देणारे, आर्थिक व्यवस्थेत भर घालणारे आणि लोकांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करणारे असतात, अशा उद्योजकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात कौतुकाची भावना असून, त्यांना त्यांचे संपूर्ण पाठबळ आहे, असे गोयल म्हणाले.

जगभरात ज्या ज्या समाजांचा विकास झाला, त्यांनी स्वयंउद्यमशीलता आणि प्रश्नांवर एकत्रित , सर्वंकष समाधान शोधण्यावर भर दिला, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले. 2024 पर्यंत 5 ट्रीलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याचे स्वपन प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपल्याला देशात स्टार्ट अप कंपन्यांना भक्कम आधार देणारी कार्यसंस्कृती विकसित करावी लागेल, असे हरदीप पुरी यावेळी म्हणाले. आता लोकांची मानसिकता नोकरी मागणाऱ्या पासून ते नोकरी देणारे अशी झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या क्रमवारीमुळे, उद्योग सुरु करण्यासाठीची कौशल्ये आणि अभिनव कल्पना असणाऱ्या युवा उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असे सोम प्रकाश यावेळी म्हणाले. देश आज अशा कार्यसंस्कृतीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, असेही त्यांनी सांगितले.

“उत्तम कार्यपद्धतीचे संयोजन” ही विविध राज्यांनी स्टार्टअप च्या बाबतीत स्वीकारलेली कार्यपद्धती असून, तिचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत नवनवे उपक्रम राबवण्यासाठी राज्यांना मार्गदर्शक ठरतील अशा 166 उत्तम कार्यपद्धतींची माहिती आहे.

अहवालाची लिंक

https://www.startupindia.gov.in/content/dam/invest-india/compendium/National_Report_09092020-Final.pdf

 

परिशिष्ट

राज्यांच्या स्टार्टअप क्रमवारीचा निकाल, 2019

Category X

Category

State

Best Performer

Gujarat

Top Performers

Karnataka

Kerala

Leaders

Bihar

Maharashtra

Odisha

Rajasthan

Aspiring Leaders

Haryana

Jharkhand

Punjab

Telangana

Uttarakhand

Emerging Startup Ecosystems

Andhra Pradesh

Assam

Chhattisgarh

Delhi

Himachal Pradesh

Madhya Pradesh

Tamil Nadu

Uttar Pradesh

This group has all States and UTs except those in Category ‘Y’.

Category Y

Category

State

Best Performer

Andaman and Nicobar Islands

Leader

Chandigarh

Aspiring Leader

Nagaland

Emerging Startup Ecosystems

Mizoram

Sikkim

This group has all North-Eastern States except Assam and all UTs except Delhi.

 

 

 

 

Leaders across 7 Reform Areas

The top scoring States across each reform area have been recognised as a leader.

S. No

Pillar

Leader Names

1.

Institutional Leaders

 • Karnataka
 • Kerala
 • Odisha

2.

Regulatory Change Champions

 • Karnataka
 • Kerala
 • Odisha
 • Uttarakhand

3.

Procurement Leaders

 • Karnataka
 • Kerala
 • Telangana

4.

Incubation Hubs

 • Gujarat
 • Karnataka
 • Kerala

5.

Seeding Innovation Leaders

 • Bihar
 • Kerala
 • Maharashtra

6.

Scaling Innovations Leaders

 • Gujarat
 • Kerala
 • Maharashtra
 • Rajasthan

7.

Awareness and Outreach Champions

 • Gujarat
 • Maharashtra
 • Rajasthan

 

YB/AP

**

 

M.Chopade/R.Aghor /P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1653457) Visitor Counter : 271