आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्षवर्धन यांनी पंतप्रधानांचा; “एखाद्या देशाने आपल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गुंतवणूक आहे” हा संदेश सादर केला

Posted On: 09 SEP 2020 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियासंबंधीच्या 73 व्या सत्राला आज संबोधित केले, त्यांच्यासमवेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, डब्ल्युएचओ एसईएआरओच्या संचालक डॉ पूनम खेत्रपाल यांची उपस्थिती होती.

कोविड संक्रमणामुळे प्रथमच दोन दिवसाचा कार्यक्रम पूर्णतः आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला. 73 व्या सत्राचे थायलंड सरकारने (बँकाँकहून) आयोजन केले होते, तर यापूर्वीचे सत्र नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. डॉ हर्षवर्धन यांनी सत्राचा शुभारंभ 72 व्या सत्राचे अध्यक्ष या नात्याने केला आणि थायलंडचे उपपंतप्रधान आणि आरोग्यमंत्री अनुतीन चार्नवीराकुल यांच्याकडे पदभार सोपवला.

डॉ हर्षवर्धन यांनी, प्रातांत कोविड-19 मुळे झालेल्या जिवीतहानीबद्दल शोक व्यक्त केला. तसेच स्वतःची सुरक्षा धोक्यात घालून काम करणाऱ्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

डॉ हर्षवर्धन अशा प्रकारच्या प्रादेशिक समित्यांचे महत्त्व अधोरेखीत करताना म्हणाले, आपल्या सामूहिक प्रयत्नांच्या परिणामांची झालेली प्रगती केवळ ठळकपणे मांडण्यासाठी नाही तर सर्वात जास्त प्राधान्यप्राप्त प्रादेशिक आणि जागतिक सार्वजनिक आरोग्याच्या समस्या आणि भविष्यातील मार्गांवर चर्चा करण्यासाठी देखील हा प्लॅटफॉर्म अतिशय उपयुक्त आहे. आग्नेय आशिया प्रदेश, त्याच्या 11 सदस्य देशांसह, जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो, या प्रदेशात आरोग्य व्यवस्था मजबूत केल्यामुळे तीन अब्जाचे ध्येय आणि शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करता येईल. हजारो मैलांच्या अंतरावरुनदेखील ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे आपले ध्येय आपल्या सर्वांना एकत्रित करते आणि हेच ध्येय आज आपल्या क्षेत्रीय आरोग्यावरील संमेलनाला कारणीभूत ठरले, असे ते म्हणाले. भविष्यात लवकरच प्रत्यक्ष आणि सुरक्षितरित्या भेटू, असे डॉ हर्षवर्धन याप्रसंगी म्हणाले.

बैठकीत भारताचे प्रतिनिधीत्व करताना डॉ हर्षवर्धन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, महामारीच्या काळात नागरिकांचे आयुष्य आणि उपजिवीका सुरक्षित करण्यासंदर्भात केलेल्या उपायांची माहिती दिली. विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने कोणतीही कसर सोडली नाही, असे ते म्हणाले. भारताच्या शाश्वत आरोग्य ध्येयाविषयी बोलताना त्यांनी राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 ची माहिती दिली, याचे ध्येय देशातील नागरिकांना स्वस्त दराने आरोग्य सुविधा पुरवणे आहे. तसेच 2018 मध्ये सुरु करण्यात आलेल्या आयुष्मान भारत योजना, जी मोफत आरोग्यसेवा सुनिश्चित करणारी जगातील सर्वात मोठी शासन-पुरस्कृत योजना आहे, याविषयी सांगितले. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून स्वस्त दराने चांगल्या दर्जाची औषधे गरजेच्या काळात पुरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सदस्य देशांना माहिती दिली की, पोलिओचे उच्चाटन आणि नवजात टिटॅनस आणि मातामृत्यूदर आणि नवजात अर्भक मृत्यू दरात विलक्षण कपात झाली आहे. भारतातून 2025 पर्यंत क्षयरोगाचे निर्मुलन करण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयाची माहिती दिली, हे जागतिक ध्येयाच्या पाच वर्ष अगोदर आहे आणि लिम्फॅटिक फाइलेरियासिस आणि काला-आजारसारखे उष्णकटिबंधीय रोगाचे उच्चाटन करण्याप्रतीची वचनबद्धता प्रकट केली.  

आरोग्यासंबंधीच्या बहुपक्षीय आणि बहु-क्षेत्रीय दृष्टीकोनाबद्दल बोलताना त्यांनी  म्हणाले, स्वच्छ भारत अभियान, सर्वांना 2022 पर्यंत घरे, पोषण मोहीम, कौशल्य विकास, स्मार्ट शहरे, योग्य आहार, फीट इंडिया आणि अशाप्रकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, ज्या माध्यमातून नागरिकांना चांगले जीवनमान मिळेल आणि त्यांच्या आरोग्याचा दर्जाही उंचावेल.

पंतप्रधानांचा दृष्टीकोन सांगताना ते म्हणाले, एखाद्या देशाने नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक सर्वात मोठी आणि महत्त्वाची आहे. राष्ट्रीय डिजीटल हेल्थ मिशनची त्यांनी याप्रसंगी माहिती दिली. डॉ हर्षवर्धन यांनी आपल्या भाषणाच समारोपाप्रसंगी सर्वांना आरोग्यक्षेत्रात गुंतवणूक करण्यात सांगितले, ते म्हणाले आज आपण येथे जमलेले सर्व लोक आरोग्यासाठी अधिक गुंतवणूक करण्यासाठी प्रेरित करु शकतो आणि अधिक गुंतवणूक घडवून आणू शकतो.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1652693) Visitor Counter : 6