आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतामध्ये कोरोना रूग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणामध्ये अभूतपूर्व वाढ


गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 75,000 रूग्ण झाले बरे

बरे झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 34 लाख

Posted On: 09 SEP 2020 2:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  9 सप्टेंबर  2020

 

गेल्या 24 तासांत कोरोना रूग्ण बरे होण्याचा भारतामध्ये नवा विक्रम झाला आहे. एका दिवसामध्ये 74,894 कोविड-19 रुग्ण बरे झाले आहेत.

याबरोबरच भारतामध्ये आता पूर्ण बरे झालेल्या एकूण रूग्णांचा आकडा 33,98,844 झाला आहे. कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.77 टक्के झाले आहे. तसेच दर आठवड्याला रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये जुलै,2020 मध्ये 1,53,118 रूग्ण बरे झाले होते. आता या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सप्टेंबर 2020च्या पहिल्या आठवड्यामध्ये 4,84,068 रूग्ण बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे संक्रमित झालेली 89,706प्रकरणे आली आहेत. त्यामध्ये एकट्या महाराष्ट्रामध्ये 20,000 पेक्षा जास्त कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तर आंध्र प्रदेशामध्ये 10,000 पेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना रूग्णांपैकी 60 टक्के रूग्ण पाच राज्यांमध्ये सापडले आहेत.

आजच्या तारखेला देशामध्ये 8,97,394 संक्रमित रूग्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. 2,40,000 पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 96,000 पेक्षा जास्त रूग्ण आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या पाच राज्यांमध्ये मिळून देशातल्या एकूण कोविड-19रूग्णांपैकी 61 टक्के संक्रमित रूग्ण आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये देशात या आजारामुळे 1,115 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात 380 जणांचे आणि त्याखालोखाल कर्नाटकमधल्या 146 जणांचे निधन झाले आहे. तर तामिळनाडूमध्ये 87 जणांचे निधन झाले आहे.

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1652589) Visitor Counter : 188