उपराष्ट्रपती कार्यालय

सर्वोत्कृष्टतेच्या भावनेचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे; सामान्यपणा हा निकष असू नये: उपराष्ट्रपती

Posted On: 05 SEP 2020 6:01PM by PIB Mumbai

 

सर्वोत्कृष्टतेच्या भावनेचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे आणि आपण सामान्यपणा हा निकष बनू देऊ नये असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले. शिक्षक दिन निमित्त फेसबुक पोस्टमध्ये  आपले विचार व्यक्त करतांना नायडू यांनी आठवण करून दिली की भारत एकेकाळीविश्वगुरु म्हणून ओळखला जात असे आणि शिक्षण जगात भारताने मोठे योगदान दिले होते.

नालंदा, तक्षशिला आणि पुष्पगिरी सारख्या नामांकित संस्थांचे उत्कृष्टतेचे उदाहरण देताना नायडू म्हणाले की भारत असा समाज आहे की जो शिक्षणाला महत्त्व देतो  आणि इथे शिक्षण हा  सर्वात उदात्त आणि पवित्र पेशा मानला जातो. भारतात  "आचार्य देवो भव " ला महत्व दिले जाते आणि शिक्षकांची पूजा केली जाते.

एकविसावे शतक हे ऐक्याचा भंग करणारे आणि आमूलाग्र बदल घडवून आणणारे युग असल्याचे सांगत  उपराष्ट्रपती म्हणाले की, जग खरोखरच एक जागतिक गाव आहे. जबाबदार जागतिक नागरिक घडविण्याची एकविसाव्या शतकातील शिक्षकांची प्रमुख जबाबदारी आहे मात्र त्याची खोल मुळे  भारतीय असावीत  यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने "शिक्षक आणि प्राध्यापकांना शिक्षण प्रक्रियेचे केंद्रस्थान" म्हणून उचित मान्यता दिली असल्याचे सांगून नायडू म्हणाले की आपण एक समाज म्हणून राष्ट्रीय विकासासाठी  शिक्षकांच्या अतुलनीय योगदानाचा आदर राखला पाहिजे.

21 व्या शतकातील शिक्षकांनी  शिकवणे आणि शिकणे आनंददायी , विद्यार्थीस्नेही  आणि प्रभावी बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करण्याचे  आवाहन केले. सध्याच्या महामारीमुळे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज असल्याचे सांगून नायडू यांनी बदललेल्या परिस्थितीशी त्वरित जुळवून घेतल्याबद्दल आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा प्रभावीपणे अवलंब केल्याबद्दल  शिक्षकांचे कौतुक केले.

उत्सुकतेची भावना, आपली बौद्धिक क्षितिजे विस्तारित करण्याची भावना आणि नवीन कल्पना आत्मसात करण्याच्या आपल्या क्षमतेचा विकास करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले. ते म्हणाले की ज्या शिक्षकांनी या दिशेने प्रयत्न केले आहेत त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करायला हवी. उत्कृष्ट शिक्षकांच्या या जमातीची भरभराट आणि विस्तार होण्यासाठी आपण एकत्रितपणे वातावरण  निर्माण केले पाहिजे असे ते म्हणाले.  केवळ तेच एक श्रेष्ठ भारत आणि एक सक्षम भारत सुनिश्चित करेल”, असे ते म्हणाले.

देशाचे पहिले उपराष्ट्र्पती आणि  दुसरे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते, त्यांना आदरांजली वाहताना उपराष्ट्रपती म्हणाले की डॉ राधाकृष्णन अतिशय मुत्सद्दी नेते, विचारवंत आणि लेखक होते.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1651599) Visitor Counter : 162