संरक्षण मंत्रालय
इंद्रा नेव्ही -20
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2020 3:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2020
भारतीय नौदल आणि रशियाचे नौदल यांच्या संयुक्त 11 वा द्वैवार्षिक संयुक्त विद्यमाने सागरी सराव 4 आणि 5 सप्टेंबर 2020 ला बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आला आहे. 2003 मध्ये सुरु झालेला इंद्रा नेव्ही म्हणजे दोन्ही देशांच्या नौदलामधल्या दीर्घकालीन धोरणात्मक संबंधांचे प्रतिक आहे. हा सराव सुरु असतांनाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 3 सप्टेंबर पासून मॉस्को दौऱ्यावर आहेत. द्विपक्षीय सहकार्य, परस्पर हिताचे मुद्दे यावर चर्चा आणि दुसऱ्या जागतिक युद्धातल्या विजयाच्या 75 व्या वर्धापनदिन स्मरणोत्सव यासाठी रशियाचे संरक्षण मंत्री जनरल सर्जेई शोईगु यांच्या निमंत्रणावरून राजनाथ सिंह हा दौरा करत आहेत.
HBNW.jpeg)
हा सरावाचा भाग, सहभागाचा स्तर यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंद्रा नेव्ही -20 चा मुख्य उद्देश दोन्ही नौदलामधले आंतर संचालन अधिक दृढ करणे आणि बहु आयामी सागरी अभियानासाठी आकलन आणि पद्धती विस्तृत करणे हा आहे. या वर्षीचा सागरी सराव व्यापक आणि वैविध्यपूर्ण सागरी बाबींनी युक्त आहे. कोविड-19 मुळे आलेल्या निर्बंधामुळे इंद्रा नेव्ही-20 ‘संपर्काविना, केवळ समुद्रात’ अशा स्वरुपात होईल.
या सरावा दरम्यान भारतीय नौदल ताफ्यात क्षेपणास्त्र विनाशिका रणविजय, स्वदेशी लढाऊ जहाज सह्याद्री आणि शक्ती या ट्यांकरचा आणि हेलिकॉप्टरचाही समावेश राहील. श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आगीचा सामना करावा लागलेल्या न्यू डायमंडला सहाय्य पुरवण्यासाठी सह्याद्री सध्या पुन्हा तैनात करण्यात आले आहे.
NITX.jpeg)
सरावासाठी रशियाच्या नौदलात विनाशिका एडमिरल विनोग्राडोव्ह, विनाशिका एडमिरल ट्रिब्युट आणि फ्लीट ट्यांकर बोरिस ब्यूटोमा यांचा समावेश आहे.
आंतर संचालन वृद्धिगत करण्याबरोबरच दोन्ही नौदलात उत्तम पद्धती बिंबवणे असा या सरावाचा उद्देश आहे. भू पृष्ठ आणि विमान विरोधी ड्रील्स, गोळीबार आणि हेलिकॉप्टर संदर्भातला अभ्यास यांचा यात समवेश असेल. याआधीचा सराव 2018 च्या डिसेंबर मध्ये विशाखापट्टणम इथे झाला होता. इंद्रा नेव्ही- 20 सरावामुळे दोन्ही नौदलात परस्पर विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होणार असून, उभय देशातले दीर्घ काळापासूनचे मैत्रीचे बंध अधिक बळकट होणार आहे.
* * *
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1651263)
आगंतुक पटल : 275