कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग, संक्रमणकाळात सुशासनातील उत्तम पद्धती याविषयीच्या आकांक्षित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेला संबोधित करणार
Posted On:
03 SEP 2020 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2020
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन खात्याचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग एनसीजीजी-नीती आयोगाने आयोजित केलेल्या कोविड-19 संदर्भातील एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्राला संबोधित करतील. संक्रमण काळातील उत्तम सुशासन पद्धती असा विषय असून आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला केंद्रीय मंत्री वेबिनारच्या माध्यमातून 4 सप्टेंबर रोजी संबोधित करतील. एकदिवसीय कार्यशाळेला विविध मंत्रालय/विभागाचे अध्यक्ष, राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी संबोधित करणार आहेत. सहभागितांमध्ये डीएआरपीजी, नीती आयोग, केंद्रीय मंत्रालय, केंद्र सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकारी जे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. समारोप सत्राला नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि डीएआरपीजी आणि डीपीपीडब्ल्युचे सचिव डॉ के. शिवाजी मार्गदर्शन करणार आहेत. नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स, प्रशासकीय सुधारणा विभाग आणि सार्वजनिक तक्रार आणि नीती आयोगाने कोविड-19 संक्रमण परिस्थितीत सुशासनाविषयीचे ज्ञान जिल्हापातळीपर्यंत पोहचावे या उद्देशाने संयुक्तरित्या या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1651089)
Visitor Counter : 179