रेल्वे मंत्रालय

राष्ट्रपतींनी जीवन रक्षा पदक प्रदान करून तीन आरपीएफ कर्मचाऱ्यांचा केला सन्मान


एकाला सर्वोत्तम जीवन रक्षा पदक आणि दोघांना उत्तम जीवन रक्षा पदक

Posted On: 02 SEP 2020 6:35PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपतींनी रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) खालील कर्मचाऱ्यांना जीवन रक्षा पदक प्रदान करून सन्मानित केले आहे: 

1.  सर्वोत्तम जीवन रक्षा पदक (मरणोत्तर) दिवंगत जगबीर सिंह, हवालदार / उत्तर रेल्वे.

दिवंगत जगबीर सिंह यांनी कर्तव्यावर असताना आदर्शनगर-आझादपूर रेल्वे विभाग, दिल्ली जवळील रेल्वे परिसरात 4 मुलांचे जीवन वाचवताना आपले प्राण गमावले. अतुलनीय शौर्य दाखवत त्यांनी त्यांच्या कर्तव्याच्या सर्व सीमा ओलांडून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या मुलांचे प्राण वाचवले.

 

2.  उत्तम जीवन रक्षा पदक- शिवचरण सिंह, हवालदार / पश्चिम रेल्वे.

10 ऑगस्ट 2019 रोजी रेल्वे क्रमांक 12959 मध्ये अनुरक्षण कर्तव्य बजावत असताना, शिमखयाली रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे ट्रेन थांबली असता शिवचरण याच्या लक्षात आले की, काही लोकं पुरात अडकले आहेत आणि ते मदतीसाठी ओरडत आहेत. शिवचरण सिंग स्वत: च्या जीवाची पर्वा न करता, त्या लोकांना वाचवण्यासाठी धावले आणि 9 लोकांचे प्राण वाचवले.

 

3.  उत्तम जीवन रक्षा पदक- - मुकेश कुमार मीना मुख्य हवालदार / उत्तर पश्चिम रेल्वे.

मुकेश कुमार मीना, मुख्य हवालदार/आरपीएफ/जोधपुर विभाग, हे 16 सप्टेंबर 2018 रोजी रेल्वे क्रमांक 22478 मध्ये अनुरक्षण कर्तव्य बजावत असताना 2 मुलांसह 1 महिला प्रवाशाचे प्राण वाचवून उल्लेखनीय शौर्य दाखवले. मुकेश मीणा यांनी धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि त्या महिला प्रवाशाला तिच्या मुलांसह फलाट व ट्रेनमधील मोकळ्या जागेतून बाहेर काढले.

*****

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1650711) Visitor Counter : 139