रसायन आणि खते मंत्रालय

गौडा आणि मांडवीय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली आणि रायबरेली यांच्या  कामकाजाचा आढावा


चाचणी, सल्ला आणि इनक्युबेशन केंद्रासारख्या सेवांच्या विस्ताराद्वारे उद्योगांना खासकरुन एमएसएमईंना मदत करणे ही काळाची गरज आहे: गौडा

लोक कल्याणाच्या दृष्टीने मोठा परिणाम करणारी संशोधन कामे प्राधान्याने जलद करायला हवीत: मांडवीय

Posted On: 02 SEP 2020 4:45PM by PIB Mumbai

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) मोहाली आणि रायबरेली यांच्या कामकाजाविषयी केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा आणि रसायने व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली.

 

या बैठकीला सचिव (फार्मास्यूटिकल्स) डॉ. पी डी वाघेला आणि फार्मास्यूटिकल्स विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आगामी मोठ्या प्रमाणावरील औषध निर्मितीत व वैद्यकीय उपकरणाच्या पार्क्सच्या विकासात नायपरची भूमिका महत्वपूर्ण आहे असे गौडा यांनी या बैठकीत सांगितले. क्षयरोग, मलेरिया, काळा  आजार, कर्करोग, मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी आजारांवर औषध शोधण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. औषध पुनरुत्थान आणि औषधांचा विकास यासुद्धा लक्ष देण्याच्या अन्य गोष्टी असू शकतात असे ते म्हणाले. मोहालीसारख्या नायपरने स्वत: ची उत्कृष्ट केंद्रे विकसित केली पाहिजेत कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विद्यमान सरकारचा संशोधन व विकासावर भर आहे असेही त्यांनी सांगितले.

 

M.Chopade/V.Joshi /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1650649) Visitor Counter : 102