वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

निर्यांतदारांना 1सप्टेंबर,2020 ते 31 डिसेंबर,2020 कालावधीमध्ये एमईआयएसच्या कमाल मर्यादेचा लाभ

Posted On: 02 SEP 2020 12:49PM by PIB Mumbai

 

एमईआयएस म्हणजेच मर्चंडायइस एक्सपोर्टस फ्रॉम इंडियाच्यावतीने निर्यातदारांना त्यांचा माल निर्यात करताना कमाल मर्यादेचा लाभ देण्यात येणार आहे. हा लाभ आगामी चार महिने म्हणजे दि. 1 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2020 कालावधीमध्ये निर्यात केल्या जाणा-या मालावर घेता येणार आहे. या संदर्भामध्ये डीजीएफटी अर्थात परकीय निर्यात संचालनालयाच्यावतीने  काल सायंकाळी एक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत ज्या आयईसीधारकांची निर्यात दोन कोटींपेक्षा कमी आहे, त्यांना या कमाल मर्यादेचा लाभ मिळू शकणार आहे. अर्थात ही दोन कोटींपेक्षा कमी निर्यात 1.09.2020 ते 31.12.2020 या कालावधीत केलेली असली पाहिजे. तसेच 01 सप्टेंबर2020 पूर्वी आयईसी धारकांनी एक वर्षभर केलेल्या निर्यातीवर ही सवलत मिळणार नाही. तसेच दि.1 सप्टेंबर रोजी किंवा त्यानंतर एमईआयएसअंतर्गत कोणताही दावा करता येणार नाही. त्याचबरोबर एमईआयएसची योजना दि. 1 जानेवारी,2021 रोजी मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे या चार महिन्यांसाठी असलेल्या कमाल मर्यादेच्या लाभ निर्यातदारांना घेता येईल. दि.1.09.2020 ते 31.12.2020 या काळामध्ये सरकारने या योजनेसाठी 5,000 कोटींचे विहीत वितरण केले आहे, त्याच्या मर्यादेत वाढ केली जाणार नाही, असेही अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.

एका अंदाजानुसार या एमईआयएसच्या दाव्यानुसार 98 टक्के निर्यातदारांवर कोणताही प्रभाव पडणार नाही. एमईआयएसच्या निर्यातदारांना कोणत्याही प्रकारच्या बदलाला किंवा अनिश्चिततेचा सामना करावा लागणार नाही. कारण उत्पादनाची व्याप्ती त्याचबरोबर एमईआयएसच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत. यामुळे भविष्यातल्या मूल्य निर्धारणासाठी निश्चितता प्रदान करणे चार महिन्यात शक्य होणार आहे.

-------

U.Ujgare/S.Bedekar /P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1650590) Visitor Counter : 36