वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत -अमेरिका व्यापाराला अधिक उंचीवर नेण्याचे पीयूष गोयल यांचे आवाहन; जागतिक मूल्य शृंखलेमध्ये दोन देशांच्या व्यापारामध्ये लवचिकता आणून विश्वासू भागीदार बनू शकतात
अमेरिकेबरोबर प्रारंभी मर्यादित व्यापार करण्यास भारत स्वाक्षरी करण्यास तयार - पीयूष गोयल
Posted On:
01 SEP 2020 10:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर,2020
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकन व्यवसाय आणि उद्योजकांना त्यांच्या भारतीय भागातल्या सहकार्यांसह व्दिपक्षीय व्यापार अधिकाधिक उंचीवर नेण्याचे आवाहन केले आहे. अमेरिका - भारत रचनात्मक सहभागीता आघाडीच्यावतीने (यूएसआयएसपीएफ) आयोजित करण्यात आलेल्या आभासी कॉन्फरन्समध्ये गोयल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, दोन्ही देशामध्ये लोकशाही मार्गाने आलेले सरकार कार्यरत आहे. व्यवसाय आणि जनतेविषयी दोन्ही सरकारे वचनबद्ध आहेत. त्याचबरोबर दोन्ही देश मुक्त आणि स्वच्छ व्यापारावर विश्वास ठेवतात. भारताच्या दृष्टीने अमेरिका एक सर्वात मोठा व्यापरिक भागीदार आहे. या व्यापाराच्या पलिकडे जावून जगामध्ये दोन्ही राष्ट्रे जागतिक मूल्य साखळीमध्ये लवचिकता आणून विश्वासार्ह भागीदार बनू शकतात, असे पीयूष गोयल यावेळी म्हणाले.
भारताच्यावतीने यूएसआयएसपीएफच्या सदस्यांना उद्योग आणि गुंतवणुकीसाठी कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येतात, याची प्रत्येक टप्प्याची माहिती पीयूष गोयल यांनी यावेळी दिली. देशातल्या सहा राज्यांमध्ये भूमी -बँक प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना व्यवसाय, उद्योगासाठी जमीन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच अनेक परवान्यांसाठी एकल खिडकी कार्यपद्धती आहे. केंद्र, राज्य आणि महानगरपालिका या स्तरावर व्यवसायाला मान्यता देण्यासाठी अधिकारी,संस्था यांच्या सहकार्याने कार्यपद्धती विकसित करण्यात आली आहे. अमेरिका आणि भारत यांच्यामधील व्यापार करार याविषयी बोलताना पीयूष गोयल म्हणाले, भारत प्रारंभीच्या पॅकेजवर स्वाक्षरी करण्यास तयार आहे.
व्यापार आणि व्यवसायामध्ये अनेक आव्हाने नक्कीच आहेत, मात्र त्यांना संधी मानण्याची आवश्यकता आहे. कोविड-19 च्या महामारी काळामध्ये अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता सर्व स्थिती पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत, असे सांगून पीयूष गोयल यांनी भारताने या काळात विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीची माहिती दिली.
लॉकडाउनच्या काळामध्ये देशातल्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यासाठी दिलेल्या पॅकेजमुळे लोकांना साथीच्या काळाशी सामना करणे शक्य झाले असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनामुळे भारत नेहमीच दोन पावले पुढे आहे, असे गोयल यांनी नमूद केले. आगामी पाच वर्षात देशातल्या 1.3 अब्ज लोकांची भरभराट होईल, असा विश्वास पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
* * *
B.Gokhale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1650501)
Visitor Counter : 197