संरक्षण मंत्रालय

पूर्व लडाखमधल्या परिस्थितीबाबत अद्ययावत माहिती

Posted On: 31 AUG 2020 12:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

29 आणि 30 ऑगस्ट 2020 च्या रात्री, चीनच्या  पीएलए सैनिकांनी, पूर्व लडाख मधल्या संघर्षाबाबत लष्करी आणि राजनैतिक चर्चे दरम्यान याआधी झालेल्या सहमतीचा भंग करत,  जैसे थे परिस्थितीत बदल घडवणाऱ्या चिथावणीखोर लष्करी हालचाली केल्या. पॅन्गोंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरच्या पीएलएच्या या हालचालींना भारतीय सैन्याने प्रतिबंध करत आपली स्थिती मजबूत करण्यासाठी पावले उचलली आणि जमिनीवरच्या  तथ्यात बदल घडवण्याचा चीनचा हेतू विफल ठरवला. चुशूल इथे या मुद्याबाबत ब्रिगेड कमांडर स्तरावर  फ्लेग बैठक सुरु आहे.   चर्चेद्वारे शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कर कटीबद्ध आहे त्याचबरोबर आपल्या प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठीही तितकेच ठाम आहे.

कर्नल अमन आनंद

जन संपर्क अधिकारी ( सैन्यदल )

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649954) Visitor Counter : 370