पंतप्रधान कार्यालय
ओणमचा सणही आता मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होत आहे - पंतप्रधानांचे मन की बात मध्ये वक्तव्य
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2020 6:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झालेल्या मन की बात कार्यक्रमात ओणम सणाबद्दल चर्चा केली. ते म्हणाले की हा सण चिणगम महिन्यात येतो. या काळात लोक काही ना काही नवीन खरेदी करतात, आपल्या घरांची सजावट करतात, पक्क्लम बनवतात, ओणम-सादियाचा आनंद घेतात, असे ते म्हणाले.
ओणम आता अतिशय वेगाने एक आंतरराष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ओणमचा उत्साह, आता अगदी दूर परदेशांमध्येही पोहचला आहे.
ओणम आपल्या कृषी क्षेत्राशी निगडीत सण आहे. आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी देखील हा प्रारंभाचा काळ असतो. शेतकरी बांधवांच्या शक्तीवरच आपले जीवन, आपला समाज चालतो, असं पंतप्रधानांनी सांगितले. वेदशास्त्रात देखील आपल्या या अन्नदात्यांची गौरवपूर्ण प्रशंसा केली असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनीं यावेळी केला. कोरोनाच्या कठीण काळात देखील शेतकऱ्यांनी आपली शक्ती पणाला लावत पिकांची मोठ्या प्रमाणावर उल्लेखनीय अशी लागवड केली आहे. अन्नदात्यांच्या या शक्तीला पंतप्रधानांनी आदरपूर्वक नमस्कार केला.
*****
B.Gokhale/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1649837)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Punjabi
,
English
,
Urdu
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam