शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्री आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री यांनी संयुक्तपणे ओदिशा केंद्रीय विद्यापीठाच्या तीन स्थायी इमारतींची पायाभरणी
Posted On:
29 AUG 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2020
ओडिशाच्या केंद्रीय विद्यापीठाने आज आपला 12 वा स्थापना दिन आभासी पद्धतीने साजरा केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस व स्टील मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते तीन स्थायी इमारतींची पायाभरणी करण्यात आली.
आपल्या भाषणात पोखरीयाल यांनी विद्यापीठाचा होणारा विकास आणि काही वर्षांतच भारतातील एक प्रमुख विद्यापीठ बनल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन केले. कोविड-19 साथीच्या आजाराच्या कालावधीत ओडिशाच्या केंद्रीय विद्यापीठाने “भरोसा” कार्यक्रम सुरू करून, विद्यार्थ्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून साथीच्या आजारावर मात करण्यास मदत केली त्यांच्या या प्रयत्नाचे मंत्र्यांनी कौतुक केले. गृह-आधारित खुले पुस्तक (होम-बेस्ड ओपन बुक) परीक्षा यशस्वीरीत्या घेतल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले. प्राचीन काळात इतर देशांतील लोक अभ्यास करण्यासाठी भारतात येत असत त्यांनी भारताच्या जुन्या गौरवशाली परंपरेचे स्मरण केले. नव्या शिक्षण धोरणाद्वारे आता अशा प्रकारचे शिक्षण पुन्हा प्राप्त करण्याची वेळ आली आहे. त्यांनी विद्यापीठ समुदायाला संशोधन व विकासावर अधिक लक्ष देण्याचे आवाहन केले.
धर्मेंद्र प्रधान आपल्या भाषणात म्हणाले की, सर्वोत्तम उंची गाठण्यासाठी विद्यापीठाकडून आणखी सहयोगपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामध्ये नॅशनल रिसर्च फाऊंडेशन अंतर्गत मार्गदर्शक कार्यक्रम, शैक्षणिक-उद्योग संबंध, आदिवासी आणि मानववंशविज्ञान अभ्यास आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि नाल्को यासारख्या परिसरातील प्रमुख उद्योगांशी सल्लामसलत सेवेचा समावेश आहे. हे राज्याचे एकमेव केंद्रीय विद्यापीठ असल्याने विद्यापीठास सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन त्यांनी दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारतचे मशाल वाहक (मशालजी) बनण्याचे आवाहन केले.
भारत सरकारचे प्रधान आर्थिक सल्लागार डॉ संजीव सान्याल यांनी स्थापना दिन व्याख्यान दिले. त्यांनी भारतातील समृद्ध शैक्षणिक संधींवर भाष्य केले आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनाचे शिक्षण देण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला ज्यामुळे विद्यार्थी पुस्तकांच्या जगातून बाहेर येऊन त्यांना वास्तविक जगाची जाणीव होईल. नवीन बदलत्या जगाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला शिक्षित करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन पद्धती आणि नवीन शिकणे आवश्यक आहे जेणेकरून शिक्षण परिपूर्ण होऊ शकेल. नवीन शिक्षण धोरण या बाबतीत अत्यंत उपयुक्त ठरेल असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास योग्य शारीरिक अंतर राखत विद्यापीठ परिसरात सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी उपस्थिती लावली तर विद्यार्थी आणि मान्यवर आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते., सहाय्यक प्राध्यापका डॉ सौरव गुप्ता यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाच्या स्मरणार्थ कॅम्पसमध्ये बारा रोपे लावण्यात आली
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1649604)
Visitor Counter : 141