संरक्षण मंत्रालय

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते एनसीसी प्रशिक्षणासाठी मोबाइल अप्लिकेशनचा प्रारंभ 

Posted On: 27 AUG 2020 2:25PM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कोर (डीजीएनसीसी) या मोबाइल प्रशिक्षण अप्लिकेशनचा आज नवी दिल्ली येथे प्रारंभ केला. देशभरातील एनसीसीच्या छात्रांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात हे अप्लिकेशन सहकार्य करेल.

कोविड – 19 मुळे घालण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता, एनसीसी छात्रांच्या प्रशिक्षणावर विपरित परिणाम झाला आहे, कारण हे प्रशिक्षण बहुत करून संपर्कावर आधारित प्रशिक्षण आहे. जसे की, भविष्यात येत्या काही काळात शाळा / महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता नसल्याने, एनसीसी छात्रांना प्रशिक्षण देण्यासाठी डिजीटल माध्यमाचा वापर करण्यात यावा, अशी एक गरज निर्माण झाली. संरक्षण मंत्र्यांनी देखील या अप्लिकेशनचा प्रारंभ करताना एनसीसी छात्रांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली. मंत्र्यांनी त्यांना उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आणि आयुष्याच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.

एनसीसीच्या छात्रांना संबोधित करताना संरक्षण मंत्री म्हणाले, थेट शारीरिक संपर्काबाबत असलेल्या निर्बंधामुळे कोविड – 19 ने निर्माण केलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि डिजीटल पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी हे अप्लिकेशन छात्रांसाठी उपयुक्त ठरेल. परंतु, एखाद्याने दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाने पुढे जायचे ठरविले तर तो किंवा ती सर्व अडथळे दूर करण्यात आणि यशस्वी होण्यास देखील सक्षम असेल, असेही त्यांनी नमूद केले. महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर असलेल्यांना विविध कामांच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्या एक लाखापेक्षा अधिक एनसीसी छात्रांच्या योगदानाबद्दल श्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. ते म्हणाले एनसीसी हे राष्ट्राप्रती एकता, शिस्त आणि सेवा यांचे मूल्य  अंगी  बाणवते आणि एनसीसी मधील काही छात्र, जसे की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, एअर मार्शल अर्जन सिंह, क्रीडा व्यक्तिमत्त्व अंजली भागवत, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर अशा व्यक्ती दिग्गज व्यक्तीमत्त्व म्हणून पुढे आल्या. यासह स्वतः संरक्षणमंत्री देखील एनसीसी छात्र होते.

एकाच व्यासपीठावर एनसीसी छात्रांना प्रशिक्षण साहित्य (अभ्यासक्रम, सारांश, प्रशिक्षणचे व्हिडिओ आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न) उपलब्ध करून देणे हा डीजीएनसीसी मोबाईल अप्लिकेशनचा मुख्य उद्देश आहे. शंका विचारण्याच्या पर्यायाबरोबर हे अप्लिकेशन सुसंवादी बनविण्यात आले आहे. हा पर्याय वापरून, छात्र त्यांचे प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमा संदर्भातील प्रश्न पाठवू शकतात आणि त्यावर पात्र शिक्षकांकडून निरसन केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजीटल इंडिया व्हिजनच्या अनुषंगाने एनसीसी प्रशिक्षण स्वयंचलित करण्याच्या दृष्टीने हे अप्लिकेशन निश्चितच एक सकारात्मक पाऊल असेल आणि साथीच्या आजाराच्या या काळात एनसीसीच्या छात्रांना प्रशिक्षण साहित्यात सुलभतेने प्रवेश करण्यास मदत होईल.

संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, महानिदेशक एनसीसी लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा आणि मंत्रालयाचे अन्य वरिष्ठ नागरी व लष्करी अधिकारी या निमित्ताने उपस्थित होते.

........

U.Ujgare/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648928) Visitor Counter : 253