कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्र सरकारचे नागरी निवृत्तीवेतनधारक डिजी लॉकरमध्ये इलेक्ट्रॉनिक पीपीओ ठेवू शकतात
डिजी लॉकरमुळे नागरी निवृत्ती वेतनधारकांचे जीवन सुलभ होईल
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2020 7:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2020
निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या हे निदर्शनास आले आहे की, अनेक निवृत्ती वेतन धारकांनी आपली पेंशन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) च्या मूळ प्रती हरवल्या आहेत. निवृत्ती वेतन धारकांसाठी त्यांची पेंशन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे. ज्या निवृत्तीवेतनधारकांकडे पीपीओ नसते त्यांना त्यांच्या सेवानिवृत्त जीवनाच्या विविध टप्प्यावर असंख्य त्रास सहन करावा लागतो. नव्याने सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांसाठी, कोविड-19 साथीच्या आजाराचा देशभर झालेला व्यापक प्रसार लक्षात घेता, पीपीओच्या हार्ड कॉपी स्वतः कार्यालयात जाऊन सादर करणे खूप कठीण काम आहे.
त्यानुसार, निवृत्ती वेतन व पेन्शनर्स कल्याण विभागाने (डीओपीपीडब्ल्यू) केंद्र सरकारच्या नागरी निवृत्तीवेतनधारकांचे जीवन सुलभ करण्यासाठी, सीजीए (महालेखा नियंत्रक) च्या पीएफएमएस एप्लिकेशनद्वारे तयार केलेले इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर (ई-पीपीओ) एकीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीचा वापर करून कोणताही निवृत्ती वेतनधारक त्यांच्या डिजी लॉकर खात्यातून पीपीओच्या नवीनतम प्रतीचे त्वरित प्रिंट-आउट घेऊ शकतो. या उपक्रमामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या डिजी लॉकरमध्ये संबंधित पीपीओची कायमची नोंद होईल आणि त्याचबरोबर नवीन निवृत्ती वेतनधारकांना पीपीओ मिळण्यास होणारा विलंब दूर होईल तसेच पीपीओची प्रत स्वतः कार्यालयात नेऊन देण्याची गरजही भासणार नाही . वर्ष 2021-22 पर्यंत नागरी मंत्रालयांसाठी हे लक्ष्य निश्चित केले होते, परंतु कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर विभागाने वेळेआधीच हे लक्ष्य पूर्ण केले.
ही सुविधा ‘भाविष्य’ (‘Bhavishya’) या सॉफ्टवेअरद्वारे तयार करण्यात आली असून, निवृत्तीवेतनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी हे एकल खिडकी व्यासपिठ आहे. ‘भाविष्य’ आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यास आपले डिजी-लॉकर खाते त्याच्या ‘भाविष्य’ खात्याशी जोडण्याचा आणि अखंड मार्गाने ई-पीपीओ मिळवून देण्याचा पर्याय प्रदान करेल.
निवृत्ती वेतन धारकांच्या डिजी लॉकरमध्ये ई-पीपीओ संचयित करण्यासाठी खालील चरण आवश्यक आहेतः
- ‘भाविष्य’ सेवानिवृत्त कर्मचार्यांना ई-पीपीओ प्राप्त करण्यासाठी त्यांच्या डिजी-लॉकर खाते ‘भाविष्य’शी जोडण्याचा पर्याय उपलब्ध करून देते.
- सेवानिवृत्तीचे अर्ज भरण्याच्या वेळी तसेच अर्ज सादर केल्यानंतर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना वरील पर्याय उपलब्ध असेल.
- सेवानिवृत्त व्यक्ती भविष्य मधून त्यांच्या डिजी लॉकरमध्ये हस्ताक्षर करतील आणि ई-पीपीओ डिजी लॉकर मध्ये जमा करण्यासाठी भविष्याला अधिकृत करतील.
- ई-पीपीओ जारी होताच ते आपोआप संबंधित डिजी लॉकर खात्यात संकलित केला जाईल आणि सेवानिवृत्ती कर्मचाऱ्याला भविष्य कडून एसएमएस व ईमेलद्वारे याबाबत सूचित केले जाईल.
- ई-पीपीओ पहाण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी सेवानिवृत्ती धारकाला त्याच्या डिजी लॉकर खात्यात लॉग इन करावे लागेल आणि त्या दुव्यावर क्लिक करावे लागेल.
सर्व मंत्रालये / विभाग आणि संलग्न / अधीनस्थ कार्यालये यांच्या प्रशासकीय विभागांना या सूचनांच्या पूर्ततेसाठी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याची विनंती केली आहे.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1648804)
आगंतुक पटल : 287