रसायन आणि खते मंत्रालय

कोविड - 19 मुळे वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेडने एकाच दिवसात फिनाईलच्या 51,960 बाटल्यांच्या उत्पादनाचा विक्रम नोंदवला


कोविड महामारीचा प्रादुर्भाव झाल्यापासून फिनाईलची मासिक विक्री वाढून 4.5 ते 6 कोटी रुपयांवर पोहचली

Posted On: 25 AUG 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्‍ट 2020

 


रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या  बंगाल केमिकल्स अँड फ़ार्मास्यूटिकल लिमिटेड (बीपीसीएल) ने कोविड-19 महामारीमुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्या उत्पादनांचे प्रमाण वाढवले आहे. कंपनीने एकाच दिवसात फिनाईलच्या 51,960 बाटल्या इतके उत्पादन करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.  पश्चिम बंगाल च्या उत्तर 24-परगणा स्थित बीपीसीएल  पनिहाटी या कारखान्याने ही कामगिरी केली आहे.

केंद्रीय रसायन आणि खते  मंत्री डी. वी. सदानंद गौड़ा यांनी कंपनीचे व्यवस्थापन आणि  कर्मचाऱ्यांचे विक्रमी उत्पादनाबद्दल अभिनंदन केले आहे.

 

बीसीपीएलचे संचालक (वित्त) पी. एम. चंद्रैया म्हणाले,  "बीसीपीएलच्या  120 वर्ष जुन्या इतिहासात हा सार्वकालीन उच्चांक आहे. जुलै  2020 मध्ये आम्ही एका दिवसात फिनाईलच्या  38,000 बाटल्या उत्पादन करण्यात यशस्वी झालो. त्यानंतर महिन्याभरातच  कंपनीने आपली उत्पादन क्षमता वाढवली आणि आता एकाच दिवसात फिनाईलच्या 50,000 पेक्षा अधिक बाटल्यांचे उत्पादन करत आहे. 23 ऑगस्ट  2020 रोजी 51,960 बाटल्या इतके उत्पादन करण्यात आले.

बीसीपीएलने म्हटले आहे की कोविड -19 महामारीपूर्वी कंपनी दररोज  15,000 बाटल्या इतके उत्पादन करत होती. "फिनाईलची मासिक विक्री 3 ते 3.5 कोटी रुपयांदरम्यान होती.  कोविड प्रादुर्भावापासून एका महिन्यात ती  4.5 ते 6 कोटी रुपयांपर्यंत गेली, जे उत्पादनाच्या प्रचंड मागणीचे निदर्शक आहे. "

कोविड -19 महामारीचा सामना करत  कर्मचारी, या स्वच्छता उत्पादनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी 20 ऑक्टोबर पर्यंत (पूजेची सुट्टी) दोन पाळ्यांमध्ये सर्व रविवार आणि सुट्टीचे दिवस काम करतील

बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड, ही भारताची पहिली फार्मास्युटिकल कंपनी आहे जी अनेक घरगुती, औषधी आणि औद्योगिक उत्पादनांची निर्मिती करते.


* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1648676) Visitor Counter : 201