पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
तेल आणि वायू क्षेत्रात यावर्षी 20 एप्रिलपासून 5.88 लाख कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चासह 8,363 प्रकल्प सुरू करण्यात आले
या प्रकल्पांमधून सुमारे 33.8 कोटी मनुष्य-दिवस रोजगार निर्मिती अपेक्षित
पेट्रोलियम उद्योगाने 'संकटाचे संधीत ' रूपांतर केले आणि रोजगार निर्माण करण्यासाठी तसेच विकासाला पुनरुजीवित करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्यासाठी प्रयत्नशील आहे
Posted On:
25 AUG 2020 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2020
तेल आणि वायू उद्योगाने 20.04.2020 पासून कोविड महामारीच्या सर्व प्रमाणित नियमावलीचे पालन करत 5.88 लाख कोटी रुपये अंदाजे खर्चासह 8,363 आर्थिक उपक्रम / प्रकल्पांची सुरूवात केली .
तेल आणि वायू सीपीएसई आणि जेव्ही / सहाय्यक कंपन्यांच्या या प्रकल्पांमध्ये रिफायनरी प्रकल्प, बायो रिफायनरीज, ई आणि पी प्रकल्प, विपणन पायाभूत सुविधा प्रकल्प, पाइपलाइन, सीजीडी प्रकल्प, ड्रिलिंग / सर्वेक्षण उपक्रम समाविष्ट आहेत. तेल आणि वायू सीपीएसई / जेव्ही चे सध्या 25 प्रमुख प्रकल्प सुरु आहेत ज्यांची अंदाजे किंमत 1,67,248 कोटी रुपये आहे आणि 7879 कोटी रुपये भांडवली खर्च असून यातून 76,56,825 मनुष्यदिवस रोजगार निर्मिती झाली आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान हे तेल आणि वायू कंपन्यांच्या सध्या सुरु असलेल्या सर्व प्रकल्पांचा सखोल आढावा घेत आहेत, नुकताच 24.08.2020 रोजी त्यांनी आढावा घेतला. मंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे , पेट्रोलियम उद्योगाने 'संकटांचे संधीत ' रूपांतर केले असून रोजगार निर्माण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तेल आणि वायू उद्योग युद्धपातळीवर काम करत आहेत आणि आर्थिक पुनरुज्जीवनाच्या दिशेने हातभार लावत आहेत. तेल आणि वायू क्षेत्र आर्थिक वाढीचा एक प्रमुख चालक आहे आणि म्हणूनच, या प्रकल्पांनी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे आणि रोजगार निर्मिती, भौतिक हालचालींना देखील चालना मिळेल.
या प्रकल्पांच्या अंदाजित खर्चापैकी अंदाजे 1, 20 लाख कोटी रुपये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भांडवली खर्च होईल अशी शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये (15.08.2020 पर्यंत ) सुमारे 26,576 कोटी रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे. तसेच आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये (15.08.2020 पर्यंत) या कामगार खात्याचे सुमारे 3,258 कोटी रुपये देणे आहेत.
8363 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 33..8 कोटी मनुष्य-दिवस (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) रोजगार निर्मिती अपेक्षित आहे, त्यापैकी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 9.76 कोटी मनुष्य-दिवस रोजगार निर्मितीचे लक्ष्य आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये (15.08.2020 रोजी) या तेल आणि वायू प्रकल्पांच्या अंमलबजावणीत भांडवली खर्चाच्या माध्यमातून 2.2 कोटीपेक्षा जास्त मनुष्य-दिवस रोजगार निर्माण झाले आहेत.
तेल आणि वायू कंपन्यांनी म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये त्यांनी सुमारे 41,672 कोटी रुपये रोजगारभिमुख परिचालन खर्चाचे नियोजन केले आहे, त्यापैकी 11,296 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 41,672 कोटी रुपयांच्या या परिचालन खर्चामध्ये सुमारे 14.5 कोटी मनुष्य-दिवस रोजगार (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष) निर्माण करण्याची क्षमता आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये (15.08.2020 रोजी) परिचालन खर्चाच्या माध्यमातून सुमारे 4.4 कोटी मनुष्य-दिवस प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाले आहेत.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सुमारे 24 कोटी मनुष्य दिवस (प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष) रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या तेल आणि वायू कंपन्यांमार्फत एकूण 1.62 लाख कोटी रुपये (कॅपेक्स आणि ऑपेक्स ) खर्च केले जाण्याचे लक्ष्य आहे. खर्च केलेली ही रक्कम गुंतवणूकीचे एक चक्र निर्माण करेल आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनात निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि आपल्या देशातील लोकांना रोजगाराच्या संधी देखील प्रदान करेल.
B.Gokhale /S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1648603)
Visitor Counter : 214