रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

मोटार वाहन कागदपत्रांच्या वैधतेला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Posted On: 24 AUG 2020 5:06PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 30 मार्च आणि 9 जून रोजी मोटार वाहन कायदा-1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत मुदतवाढीची सूचना प्रसिद्ध केली होती. त्यात फिटनेस, परमिट (सर्व प्रकार), परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांची वैधता 30 सप्टेंबर 2020 असल्याचे सांगितले होते.

देशभरातील कोविड-19 संक्रमण परिस्थिती पाहता, वर निर्देशित केलेली कागदपत्रे ज्यांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपली आहे किंवा 31 डिसेंबर 2020 रोजी संपणार आहे, त्या सर्वांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अशी कागदपत्रे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या या निर्णयाचा नागरिकांना वाहतुकीसंबंधी सेवा घेताना लाभ होईल.  

***

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648212) Visitor Counter : 307