आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

देशात एका दिवसात विक्रमी 63,631 रुग्ण बरे


बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 22 लाखांपेक्षा अधिक

सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15 लाखांपेक्षा अधिक

Posted On: 22 AUG 2020 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2020

 

देशात दररोजच्या चाचण्या 10 लाख 23 हजारापर्यंत पोहचल्या असतानागेल्या 24 तासांत 63,631 रुग्ण बरे झाल्याचा आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.

अधिकाधिक कोविड-19 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून सुट्टी दिली जात आहे तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृह अलगीकरण करण्यात येत आहे, यामुळे देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 74.69% एवढा झाला आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊन, आज तो 1.87% आहे.

देशातील बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्येने एकूण सक्रीय रुग्णसंख्या ओलांडली आहे (6,97,330), जी 15 लाखांहून अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णभार म्हणजेच सक्रीय रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 23.43% सक्रीय रुग्ण आहेत. चाचण्यांमधून लवकर निदान, व्यापक देखरेख आणि संपर्क शोधण्याबरोबरच वेळेत आणि प्रभावी रुग्णालय उपचारामुळे लवकर बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या आणि कमी होत जाणारा मृत्यूदर यामुळे देशातील श्रेणीबद्ध आणि सक्रीय रणनितीचे प्रत्यक्ष यश दिसत आहे.  

समग्र देखभाल दृष्टिकोनावर आधारित, जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे धोरण, व्यापकपणे मागोवा घेणे आणि प्रभावीपणे उपचार करणे, तसेच घरोघरी जाऊन घेतलेला संपर्क मागोवा यामुळे कोविड-19 रुग्णांचे लवकर निदान होत आहे. सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या रुग्णांचे गृह अलगीकरण करुन लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रमाणित रुग्णालय व्यवस्थापन प्रोटोकॉलनुसार, गंभीर आणि अतिगंभीर रुग्णांना दवाखान्यात भरती करुन त्यांना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहेत.  

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/आणि @MoHFW_INDIA.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .

कोविड-19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1647924)