रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

श्री गडकरी यांनी आधुनिक आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या रस्ते प्रकल्पांचा घेतला आढावा;  `हरित पथ` मोबाईल अप सुरू; प्रकल्पांचे ई – टॅगिंग सुनिश्चित करण्यासाठी सूचना


रस्ते बांधकाम खर्च 25 टक्क्यांनी कमी करण्याचा मंत्र्यांचा पुनरुच्चार

Posted On: 21 AUG 2020 5:58PM by PIB Mumbai

 

देशभरात आधुनिकेचा आणि हरित तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते बांधणी करण्यावर केंद्रिय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री श्री नितीन गडकरी यांनी भर दिला आहे. नवीन हरित महामार्ग योजनेचा (प्रकल्प) आढावा घेताना आणि रस्ते बांधणी बाबत काही नवीन तंत्रज्ञान याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, बांधकाम खर्चात 25 टक्के कपात करण्याचे आपले उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे.

भौगोलिक टॅगिंग आणि वेब आधारित जीआयएस सक्षम देखरेख करणाऱ्या साधनांद्वारे वृक्षारोपणाचे परीक्षण करण्यासाठी एक `हरित पथ` हे मोबाईल अप मंत्र्यांनी सुरू केले. वृक्षारोपण प्रकल्पातील रोपांची निश्चित जागा, वाढ, प्रजातीची माहिती, देखरेखीचे उपक्रम, उद्दिष्ट आणि यश यावर देखरेख ठेवण्यासाठी एनएचएआयच्या वतीने हे अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. मोबाईल अपचे उद्घाटन करताना, वृक्षारोपण आणि झाडांचे पुनर्रोपण यावर काटोकोरपणे देखरेख ठेवण्यावर मंत्र्यांनी भर दिला. 

महामार्गालगत वृक्षारोपण करण्यासाठी एखादी माहितगार, तज्ज्ञ व्यक्ती / संस्था यांना भाडेतत्त्वावर काम द्यावे, असे मंत्र्यांनी सुचविले. बिगर शासकीय संस्था, स्वयंसहायता गट आणि फलोत्पादन आणि वनविभाग यांना यामध्ये सहभागी करून घ्यावे, असे त्यांनी सुचविले. मार्च 2022 पर्यंत महामार्गालगत वृक्षारोपणाचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणे शक्य होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

झाडांचे पुनर्रोपण करण्याच्या मुद्द्यावर चर्चा करताना, श्री गरडकर म्हणाले की, सर्व झाडांची कत्तल होण्यापासून त्यांना वाचविणे हे आपले उद्दिष्ट राहील आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या तज्ज्ञ संस्थांना भाडेतत्त्वावर काम दिले गेले पाहिजे. मजबूतीकरणासाठी स्थानिक स्वदेशी साहित्य, जसे की, गोणपाट, काथ्या इत्यादी गोष्टी वापरण्यावर मंत्र्यांनी भर दिला. श्री गडकरी यांनी असेही सांगितले की, स्थानिक परिस्थितीनुसार अनुकूल प्रजाती निवडणे देखील खूप महत्त्वाचे आहे.

रस्ते बांधणीच्या नवीन तंत्रज्ञानाविषयी चर्चा करताना, ते म्हणाले की, बांधकामाचा खर्च 25 टक्क्यांनी कमी करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यासाठी या नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे. ते म्हणाले की, विशिष्ट परिसर जसे की, टेकड्यांचा परिसर, सीमाभाग आणि किनारपट्टीचा परिसर या ठिकाणी वेगळा दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाचा विचार झाला पाहिजे. अंदमान आणि निकोबारमध्ये अशा तंत्रज्ञानाचा वापर झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आणि एनएचआयडीसीएलला अन्य प्रकल्पांसाठी त्याचे अनुसरण करण्यास प्रोत्साहन दिले.

.....

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647650) Visitor Counter : 199