ग्रामीण विकास मंत्रालय

गरीब कल्याण रोजगार अभियानाच्या सातव्या आठवड्यापर्यंत जवळपास 21 कोटी मनुष्यदिन रोजगार पुरवण्यात आला आणि यासाठी 16,768 कोटी रुपये खर्च करण्यात आले


गावाकडे परतलेल्या स्थलांतरीत मजूरांना तसेच कोविड-19 महामारीच्या परिस्थितीचे परिणाम भोगणाऱ्या ग्रामीण जनतेला रोजगार आणि उपजीविकेच्या संधींची उपलब्धता मिळवून देण्यासाठी हे अभियान सुरू केले गेले

Posted On: 20 AUG 2020 7:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑगस्‍ट 2020

 

आपल्या गावी परतलेल्या बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमधल्या स्थलांतरीत मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम गरीब कल्याण रोजगार अभियान(GKRA)  प्राधान्यक्रमाने करत आहे. या सहा राज्यामधील 116 जिल्ह्यातील गावकऱ्यांना  आभियानातर्फे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

अभियानाच्या सातव्या आठवड्यापर्यंत जवळपास 21 कोटी मनुष्यदिन रोजगार देण्यात आला आणि यासाठी आतापर्यंत 16,768 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या अभियानाच्या उद्दिष्टांच्या कार्यकक्षेअंतर्गत 77974 जलसंधारण बांधकामे, 2.33 लाख ग्रामीण घरे,  17933 गोठे, 11372 शेततळी, 3552 सामुदायिक शौचालये ही मोठमोठाली बांधकामे करण्यात आली. याशिवाय,6300 कामे जिल्हा मिनरल निधीतून करण्यात आली. 764 ग्रामपंचायतींना  इंटरनेट कनेक्टीविटी देण्यात आली आणि या अभियानाद्वारे  25487 उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे (KVKs) कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. 

गरीब कल्याण रोजगार अभियानाचे यश हे 12 मंत्रालय/विभाग आणि राज्य सरकारे यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिपाक आहे. त्यामुळेच स्थलांतरीत मजूर आणि ग्रामीण समुदायाला जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यात अभियान यशस्वी झाले आहे.

गावाकडे परतलेल्या स्थलांतरीत मजूरांना तसेच कोविड-19 महामारीच्या परिस्थितीचा परिणाम झालेल्या ग्रामीण जनतेला रोजगार आणि उपजीविकेच्या संधींची उपलब्धता मिळवून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले होते. जे परत जाणार नाहीत त्यांच्यासाठी रोजगार आणि उपजीविकेच्या संधींची कायमस्वरुपी उपलब्धता निर्माण करण्याच्या दृष्टीने आभियानाच्या उद्देशांची आखणी करण्यात आली आहे.  

 

* * *

B.Gokhale/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647392) Visitor Counter : 157