विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19 संबंधी भारत-अमेरिका व्हर्च्युअल नेटवर्कना पुरस्कार जाहीर
Posted On:
18 AUG 2020 3:53PM by PIB Mumbai
भारत आणि अमेरिकेच्या संशोधकांचा समावेश असलेल्या आठ द्विपक्षीय दलांना भारत -अमेरिका व्हर्च्युअल नेटवर्क्सच्या माध्यमातून कोविड-19 आजार आणि त्याच्या व्यवस्थापनामध्ये अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रांमध्ये अँटीव्हायरल कोटिंग्ज, इम्म्युन मॉड्युलेशन, सांडपाण्यात सार्स सीओव्ही-2 चे ट्रॅकिंग, रोग शोधण्याची यंत्रणा, रिव्हर्स जेनेटिक रणनीती आणि औषधांचा बहुउद्देशीय वापर यांचा समावेश आहे.
भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाने (आययूएसएसटीएफ) या दोन्ही देशांचा समावेश असलेल्या आठ दलांना पुरस्कार जाहीर केले. या दलांमध्ये कोविड -19 भारत-अमेरिका आभासी नेटवर्कसाठी भारत आणि अमेरिकेच्या आघाडीच्या संशोधकांचा समावेश आहे. कोविड -19 महामारी आणि उदयोन्मुख जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी वैद्यकीय आणि वैज्ञानिक समुदायाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले. भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंच ही एक स्वायत्त द्विपक्षीय संघटना आहे जिला भारत सरकार आणि अमेरिकन सरकारकडून संयुक्तपणे वित्तसहाय्य पुरवले जाते. ही संघटना सरकार, शिक्षणतज्ञ आणि उद्योग यांच्यातील महत्त्वपूर्ण संवादाच्या माध्यमातून विज्ञान , तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि अभिनवतेला प्रोत्साहन देते केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अमेरिकेचा परराष्ट्र विभाग हे संबंधित नोडल विभाग आहेत.
भारतीय आणि अमेरिकन विज्ञान व तंत्रज्ञान समुदायाचे एकत्रित कौशल्य वाढवणे, कोविड संबंधी संशोधनात सध्या सहभागी असलेले भारतीय आणि अमेरिकन वैज्ञानिक आणि अभियंत्यांच्या दलांमध्ये भागीदारी सुलभ करणे, संशोधन आणि प्रगतीला गती देण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधांचा वापर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या प्रस्तावांना प्रतिसाद म्हणून प्राप्त झालेल्या काही निवडक प्रस्तावांमध्ये या आठ दलांच्या प्रस्तावांचा समावेश होता.
या दलांचे अभिनंदन करताना भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाच्या (IUSSTF) सह-अध्यक्षांनी अमेरिका-भारत भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि आययूएसएसटीएफ इंडियाचे सह-अध्यक्ष प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले, “कोविड -19 संबंधी विशेष आवाहनाला अगदी कमी अवधीत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, भारत आणि अमेरिका यांच्यातील सहकार्याचे विस्तृत दर्शन घडवतो, ज्यामध्ये सार्स -सीओव्ही -2 विषाणूचा प्रसार आणि त्याचे निदान आणि उपचारसंबंधी दृष्टिकोनांवरील मूलभूत अभ्यास समाविष्ट आहे. आरोग्य, ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आमचे विद्यमान दृढ सहकार्य योग्य उपाय पुरवण्याला महत्व देण्यात योगदान देत आहे.
द्विराष्ट्रीय भारत-अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान मंचाचे ध्येय - वैयक्तिक वैज्ञानिक, वैज्ञानिक संस्था आणि संपूर्ण वैज्ञानिक समुदायामधील भागीदारीच्या माध्यमातून भारत आणि अमेरिकेदरम्यान दीर्घकालीन वैज्ञानिक सहकार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करणे हे आहे.
****
B.Gokhale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646685)
Visitor Counter : 192