आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

लस वाटपावरील राष्ट्रीय तज्ञ गटाने देशांतर्गत लस उत्पादकांची घेतली भेट

Posted On: 17 AUG 2020 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 ऑगस्‍ट 2020

 

लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटाने आज देशातील आघाडीचे लस उत्पादक-सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे , भारत बायोटेक, हैदराबाद; झायडस कॅडिला, अहमदाबाद; जिनोवा बायोफार्मास्युटिकल्स, पुणे; आणि बायोलॉजिकल  ई, हैदराबाद.यांची भेट घेतली

ही बैठक परस्पर हिताची  आणि परिणामकारक होती.

या बैठकीत राष्ट्रीय तज्ज्ञ गटाला देशातील उत्पादकांकडून तयार करण्यात येत असलेल्या विविध लसींच्या सध्याच्या टप्प्याविषयी तसेच केंद्र सरकारकडून त्यांच्या अपेक्षांबाबत माहिती देण्यात आली.   

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1646546) Visitor Counter : 217