माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आयआयएमसीचा 56 वा स्थापना दिवस साजरा
स्थापना दिनाच्या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांचे प्रमुख भाषण
माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख प्रशिक्षणाची गरज-अमित खरे
प्रविष्टि तिथि:
17 AUG 2020 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2020
भारतीय जनसंवाद संस्था, आय आय एम सी चा 56 वा स्थापना दिवस आज साजरा झाला. यानिमित्त संस्थेच्या देशभरातील प्रादेशिक केंद्रांमध्ये तसेच दिल्लीतील मुख्यालयातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या स्थापना दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात माहिती आणि प्रसारण विभाग तसेच उच्चशिक्षण विभागाचे सचिव, आणि आयआयएमसी चे अध्यक्ष, अमित खरे यांचे प्रमुख भाषण झाले.
यावेळी खरे यांनी,“राष्ट्रीय शिक्षण धोरण- तत्वज्ञान आणि मार्गदर्शक तत्वे,तसेच या धोरणात देशातील जनसंवाद शिक्षणक्षेत्रासाठी असलेल्या संधी आणि वैशिष्ट्ये” या विषयावर मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने आयआयएमसीनेही, केंद्र आणि राज्यांच्या अखत्यारीतील विविध विद्यापीठांशी चर्चा करत, पत्रकारिता आणि जनसंवाद या क्षेत्रातील अभ्यासक्रमांचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना खरे यांनी केली.
तंत्रज्ञान-प्रेरित शिक्षणावर भर देत त्यांनी पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील उदयोन्मुख विषयांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करावेत, असा सल्ला दिला. राष्ट्रीय शिक्षण मंचांसाठी या माध्यमातून उत्तम साहित्य तयार केले जावे, असेही ते म्हणाले.माध्यमातील विद्यार्थ्यांचा उत्तम जागतिक दृष्टीकोन’ विकसित व्हावा, यासाठी त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण- प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
संशोधन आणि प्रशिक्षण यासाठी आय आय एम सी ने आय सी एस एस आर आणि जे एन यु अशा संस्थांशी समन्वयाने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयआयएमसी चे महासंचालक, प्राध्यापक संजय द्विवेदी यांनी केले तर, अतिरिक्त महासंचालक, के सतीश नम्बुद्रीपाद यांनी मान्यवर आणि उपस्थितांचे आभार मानले.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646504)
आगंतुक पटल : 211