PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
16 AUG 2020 7:12PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 16 ऑगस्ट 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) मुख्यालयात आज (16 ऑगस्ट 2020) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या तैलचित्राचे आभासी पद्धतीने अनावरण केले. परराष्ट्रमंत्री असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी मार्च 1977 ते ऑगस्ट 1979 या कालावधीत आयसीसीआरचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी नववर्ष, नवरोज निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणाले, “नवरोज मुबारक! पारसी नववर्षाच्या शुभेच्छा. ज्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशा पारसी समुदायाच्या उल्लेखनीय योगदानाची भारताला जाणीव आहे. येणारे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात शांतता आणि भरभराट घेऊन येवो, ही सदिच्छा.”
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- कोविड-19 मुळे बळी पडणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत असून आज अखेर भारतातील मृत्युदर जगात सर्वात कमी म्हणजेच 1.93% इतका आहे. केंद्र आणि राज्य /केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. 50,000 मृत्यूसंख्या ओलांडायला अमेरिकेला 23 दिवस, ब्राझीलला 95 दिवस आणि मेक्सिकोला 141 दिवसांचा अवधी लागला तर या संख्येपर्यंत पोचण्यासाठी भारताला 156 दिवस लागले. भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर जवळपास 72% पर्यंत पोहोचला आहे, तो आणखी वाढेल, याची खात्री असून अधिकाधिक रुग्ण बरे होतही आहेत. गेल्या 24 तासात 53,322 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे, या संख्येसह बरे झालेल्या कोविड -19 रुग्णांची संख्या 18.6 लाखांपेक्षा (18,62,258) जास्त झाली आहे.

इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईहून ग्रामीण भागात होणाऱ्या स्थलांतरामुळे कोविड-19 चा प्रकोप वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण समाधानाकारक आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राज्यात एकूण रुग्णसंख्या 5.84 लाख असून, 1.56 लाख सक्रीय रुग्ण आहेत.


B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1646324)
आगंतुक पटल : 232