संरक्षण मंत्रालय
एनसीसीचा 173 सीमावर्ती आणि किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मोठा विस्तार होणार
Posted On:
16 AUG 2020 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमावर्ती आणि किनारपट्टी जिल्ह्यांतील युवकांच्या आकांक्षापूर्तीसाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) मोठ्या विस्तार योजनेला मंजूरी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ही घोषणा केली होती. सीमावर्ती आणि किनारपट्टी 173 जिल्ह्यांतील 1,000 पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालांयातील एक लाख कॅडेटस एनसीसीमध्ये सहभागी होतील. यात एक-तृतीयांश कॅडेटस मुली असतील.
एनसीसी कॅडेटसच्या प्रशिक्षणासाठी 83 एनसीसी युनिट्स (लष्कर 53, नौदल 20, हवाईदल 10) यांचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे. सीमावर्ती क्षेत्रांतील एनसीसी युनिट्सना लष्कराकडून प्रशिक्षण आणि प्रशासकीय मदत केली जाईल, नौदल किनारपट्टी क्षेत्रांमध्ये आणि हवाई दल हवाई दलाच्या तळांजवळील एनसीसी युनिटसला मदत करेल.
युवकांना लष्करी प्रशिक्षण आणि शिस्तबद्ध जीवनशैली देण्याबरोबरच त्यांना सैन्य दलात सामील होण्यासाठी देखील प्रेरणा मिळेल.
एनसीसी विस्तार योजना राज्यांच्या सहकार्याने राबवली जाईल.
B.Gokhale/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646278)
Visitor Counter : 228