उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी जनतेला नवरोझ निमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 AUG 2020 12:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2020
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी जनतेला नवरोजनिमित्त एका संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. “पारसी नववर्षाचा प्रारंभ करणाऱ्या नवरोझच्या शुभ मुहूर्तावर आपल्या देशातील जनतेला माझे हार्दिक अभिवादन.”
ते म्हणाले की, कठोर परिश्रम आणि आणि समर्पणातून भारतातील पारसी समाजाने अतिशय उत्साहाने राष्ट्र उभारणीत अमूल्य योगदान दिले आहे. “पारसी नववर्ष हे वसंत ऋतूला सूचित करीत नूतनीकरण आणि पुन्हा उत्साह देणारा उत्सव आहे. नवरोजला खऱ्या अर्थाने साजरे करणे म्हणजे चांगले विचार आत्मसात करणे, चांगली कामे करणे, सत्याने जगणे आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालणे होय.”
उपराष्ट्रपती म्हणाले, कोविड-19 विरोधातला लढा सुरूच राहणार आहे, आपल्या घरापुरता मर्यादित असलेल्या उत्सावात आता आपण संतुष्ट असले पाहिजे. उत्सव साजरा करताना देखील आपण सामाजिक अंतर आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या सुरक्षा निकषांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
हा सण आपल्या आयुष्यात समृद्धी, भरभराट आणि आनंद आणेल, अशी इच्छा व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
D.Wankhede/S.Shaikh/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646261)
Visitor Counter : 143