PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
Posted On:
15 AUG 2020 7:44PM by PIB Mumbai
दिल्ली-मुंबई, 15 ऑगस्ट 2020


(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला. नेपाळच्या पंतप्रधानांनी सरकार आणि भारतीय नागरिकांना 74 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या, आणि भारताची नुकतीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सभासद म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी कोविड-19 संक्रमणाचा परिणाम कमी करण्यासंदर्भात परस्पर एकवाक्यता व्यक्त केली. याबाबतीत पंतप्रधानांनी नेपाळला भारताचे निरंतर सहकार्य जाहीर केले.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
- एका दिवसात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, भारतात एका दिवसात बरे होणाऱ्या कोविड-19 रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत 57,381 रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत असल्यामुळे, रुग्ण बरे होण्याचा दर 70% च्या वर गेला आहे. तसेच 32 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर 50% पेक्षा अधिक आहे. 12 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याच्या दराचे प्रमाण राष्ट्रीय प्रमाणापेक्षा अधिक आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात येत आहे आणि गृह अलगीकरण (सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे रुग्ण), त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 18 लाखांपेक्षा (18,08,936). अधिक झाली. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढले आहे, सध्या ते 11 लाखांहून अधिक आहे (आजची संख्या 11,40,716 एवढी आहे).
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स :
राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कोरोना चाचणीत पॉझिटीव्ह आढळले असून त्यांच्यावर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महाविकास आघाडीतील गेल्या तीन महिन्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले ते सातवे मंत्री आहेत. महाराष्ट्रात 5.73 लाख कोविड रुग्ण आहेत आणि त्यापैकी 1.51 लाख सक्रीय रुग्ण आहेत.
***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1646165)
Visitor Counter : 302