रेल्वे मंत्रालय
15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 दरम्यान सुरू होणाऱ्या "फिट इंडिया फ्रीडम रन" च्या अंमलबजावणीस भारतीय रेल्वेचा भक्कम पाठिंबा
Posted On:
14 AUG 2020 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2020
भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाने सुरू केलेल्या "फिट इंडिया फ्रीडम रन" या नव्या उपक्रमास पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2020 पर्यंत सुरू राहील. फिट इंडियन चळवळीच्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येत आहे.
"फिट इंडिया रन" ही संकल्पना सामाजिक अंतर राखतानाच स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची अपरिहार्य गरज लक्षात घेऊन केली गेली आहे. या धावण्याच्या उपक्रमात एखादी व्यक्ती त्याच्या / तिच्या आवडीच्या मार्गावर त्याच्या / तिच्या सवडीच्या वेळेनुसार चालू / धावू शकते. एखाद्याला गरज वाटल्यास या धावण्यात / चालण्यात विराम देखील घेऊ शकतात.
`फिट इंडिया फ्रीडम रन` उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री (स्वतंत्र अधिभार) आणि अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री श्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री व्ही. के. यादव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागीय रेल्वे / यूनिट यांना याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि `फिट इंडिया रन` चळवळीमध्ये अधिकाधिक मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांचा, त्यांच्या कुटुंबियांचा आणि नातलगांचा सहभाग वाढविण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि भारत सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचींचा अवलंब करून आणि www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर सांगितल्यानुसार सोप्या पद्धतींचा अवलंब करून त्यांना तंदुरुस्त होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेला फार पूर्वीपासूनच क्रीडा संवर्धनाचा उत्तम वारसा लाभला आहे. दरवर्षी 300 – 400 क्रीडापटूंना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सर्व सुविधा आणि देशात गौरव मिळवून देण्यासाठी खेळामध्ये उत्कृष्ट काम करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करून देऊन भारतीय रेल्वे हा क्रीडा क्षेत्रातील मोठा प्रवर्तक ठरला आहे. भारतीय रेल्वेकडे 29 क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 10,000 खेळाडू आणि 300 प्रशिक्षक आहेत. 2019 – 20 मध्ये 32 पैकी 6 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार भारतीय रेल्वेच्या खेळाडूंना प्रदान करण्यात आले.
* * *
B.Gokhale/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1645950)
Visitor Counter : 182